अभिनेत्री करिश्मा कपूरला तिचा पती मित्रासोबत जाण्यासाठी करीत होता आग्रह, रात्र-रात्र रडून काढली करिश्माने

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेत्री करिश्मा कपूर आज आपला जन्मदिवस साजरा करते आहे. करिश्मा एका अशा काळातून गेली आहे. जेव्हा तिला रात्रभर मार खावा लागत होता आणि सकाळी मेकअप करुन आपला चेहरा ठीक करत असे. काही वर्ष सहन केल्यानंतर करिश्माने पती संजय कपूर आणि सासू राणी कपूर यांच्यावर छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्याचवेळी करिश्माचा वकील क्रांती साठेने सांगितले होते की, ”हे घटस्फोट प्रकरण नाही, हे छळ प्रकरण आहे, आता जे चालू आहे. ते घटस्फोट प्रकरणाच्या एकदम विरुद्ध आहे. हे कौटुंबिक न्यायालयात येत नाही, न्यायिक न्यायालयात येते. ती स्वतः साठी काही मागत नव्हती. ती तिच्या मुलांसाठी करत होती. तिला आपल्या मुलांची सुरक्षा हवी होती.

करिश्माने तिच्या विवाहाबद्दल अनेक खळबळजनक खुलासे केले होते. तिने सांगितले होते की, तिच्या ४ महिन्याच्या मुलाची तब्येत खराब असल्यामुळे ती पतीसोबत यूके ट्रिपला नाही जाऊ शकली. या गोष्टीमुळे संजय खूप नाराज झाला होता आणि एकटाच निघून गेला. नंतर करिश्मा यूकेला गेली. तर संजय रात्र-रात्रभर गायब असे. त्याला मुलांच्या तब्येती बद्दल काहीच देणे-घेणे नव्हते. त्याच्यासाठी गोल्‍फ खेळणे जास्त महत्वाचे होते. हनीमूनच्या वेळी करिश्माच्या समोर संजय आपल्या भावासोबत चर्चा करत होता की करिश्मा किती पैसे आणू शकते.

हे ऐकून करिश्मा आश्चर्यचकित झाली. करिश्माने सांगितले, ”एक वेळा संजयने तिला आपल्या आईने दिलेला ड्रेस घालण्यास सांगितले. कारण करिश्मा त्यावेळी प्रग्नेंट होती आणि तिला तो ड्रेस फिट होत नव्हता. हे बघून संजय खूप नाराज झाला. त्याने त्याच्या आईला करिश्माच्या कान खाली देण्यास सांगितले. संजय करिश्माला नेहमी मारत असे. मारलेले निशाण करिश्मा मेकअप करून घालवत असे. करिश्माने हे देखील सांगितले होते. जेव्हा ते हनीमूनला गेले होते आणि त्यावेळी संजयने तिच्या मित्रांसोबत तिची बोलणी केली होती.

आरोग्यविषयक वृत्त –

सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते

धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग

झोपेत आलेल्या हार्ट अ‍ॅटकची माहिती देणार ‘हे’ नवे तंत्रज्ञान

गवारीचे ‘हे’ फायदे तुम्ही वाचले तर होईल ‘आवडती भाजी’