अभिनेत्री करिश्मा कपूरच्या ‘बोल्ड फोटोशुट’ची सोशलवर ‘धुमाकूळ’

मुबई : पोलीसनामा ऑनलाईन – करिश्मा कपूरने मंगळवारी (दि 25 जून) आपला 45 वा वाढदिवस साजरा केला. मंगळवारी वाढदिवसादिशीच करिश्माने तिचे सुपरहॉट फोटो शेअर केले आहेत ज्या फोटोंची तिच्या चाहत्यांना खूप दिवसांपासून प्रतिक्षा होती. काळ्या मोनोकीनीमधील फोटोने करिश्माने आपल्या वयाला मात दिली. करिश्माने लंडनमध्ये आपला वाढदिवस साजरा केला.

करिश्माने शेअर केलेल्या ब्लॅक मोनोकीनीमधील फोटोला एका दिवसात तब्बल 3 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. करिश्माने जो सुपरहॉट फोटो शेअर केला आहे त्यात ती स्विमिंग पूलाच्या किनाऱ्यावर पोज देताना दिसत आहे. या फोटोच्या खास कॅप्शनमध्ये करिश्मा म्हणते की, “वयाच्या प्रत्येक टप्प्यात स्वत:वर प्रेम करा. #nofilter #birthdaymood” असे करिश्माने म्हटले आहे. करिश्माच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट केली आहे. अनेकांनी तिच्या हॉटनेसचे कौतुक केले आहे. करिश्माने आजही स्वत:ला फिट ठेवले आहे. आजही ती खूप हॉट दिसत आहे.

करिश्माचा हा सुपरहॉट फोटो झपाट्याने व्हायरल होताना दिसत आहे. याशिवाय सोशलवर करिश्माचा आणखी एक फोटो व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या आणखी एका फोटोत ती आपला पुतण्या तैमूर अली खानसोबत दिसत आहेत. या फोटो ती तैमूरला वाढदिवसाचा केक भरवताना दिसत आहे.

एका मुलाखतीत करिश्माने मीडियाला सांगितले की, तिने काही काळासाठी सिनेमात काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण तिला आपल्या मुलांसोबत घरी वेळ घालवायचा आहे. करिश्मा लवकरच एल एल टी बालाजीच्या मेंटलहूड या सिनेमात दिसणार आहे.

 

आरोग्य विषयक वृत्त

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय