हिनाचा पत्‍ता कट झाल्यानंतर ‘या’ 2 सेक्सी अभिनेत्रींमध्ये कोमोलिका बनण्यासाठी ‘चढाओढ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्हीचा अतिशय लोकप्रिय शो ‘कसौटी जिंदगी की 2’ मध्ये कोमोलिकाची एन्ट्री लवकरच होणार आहे, पण यावेळी शोमध्ये कोमोलिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री हिना खान नसून दुसरीच कोणीतरी आहे. बर्‍याच काळापासून शोचे निर्माते हिना खानच्या जागी दूसरी शोधत होते आता असे दिसते की, निर्मात्यांना एक कोमोलिका सापडली आहे. अलीकडेच या शोबद्दल जॅसमीन भसीनचे नाव समोर आले होते पण असे नाही की ती शोमध्ये येणार आहे. याउलट, आणखी 2 सुंदर अभिनेत्रींची नावे पुढे येत आली आहेत, ज्यांना कोमोलिकाच्या भूमिकेसाठी अप्रोच केले गेले आहे.

स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, करिश्मा तन्ना आणि गौहर खान यांपैकी एकीला कोमोलिका म्हणून निवड करण्यासाठी निर्माते तयार आहेत. दोन्ही अभिनेत्रींनी ऑडिशन दिले आहे आणि आता असे सांगितले जात आहे की, काही काळापूर्वी गौहर खानला स्टुडिओच्या बाहेर स्पॉट केले गेले होते, तसेच करिश्मा तन्ना देखील बुल्गारियाहून खतरों के खिलाडीचे शूटिंग पूर्ण करुन आली आहे आणि तिनेही स्क्रीन टेस्ट दिल्या आहेत.

अशा परिस्थितीत कोमोलिकासाठी दोघांपैकी कोण परिपूर्ण असेल हे पाहणे फारच मजेदार असेल…? निर्मात्यांनी हे उघड केले नाही की त्यांनी कोमोलिकासाठी या दोनपैकी कोणत्या अभिनेत्रीची निवड केली आहे परंतु जी कोणी ही व्यक्तिरेखा साकारेल तो खूप मजेदार असेल.

Loading...
You might also like