सुट्टीवर ग्रीसला गेलेल्या ‘नागिन’ फेम करिश्मा तन्नाचे ‘ते’ शॉर्ट ड्रेसमधील फोटो ‘व्हायरल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्ना ग्रीसमध्ये आपला क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहे. सध्या तिचे हॉलिडे साजरा करतानाचे काही फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होत आहे.
 Karishma Tanna
ऑरेंज कलरच्या हॉट नेक ड्रेसमध्ये करिश्मा खूपच हॉट दिसत आहे. तिचे चाहतेही तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. करिश्माने आपल्या लुकला पूर्ण करण्यासाठी ओपन हेअर, गोल्डन शेड्स, हॅट आणि फ्लॅट्स यांचं छान कॉम्बिनेशन केलं आहे.

या पूर्ण लुकमध्ये करिश्मा स्टनिंग दिसत आहे. करिश्माने तिचे हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. करिश्माने आपल्या फोटोंना खास कॅप्शनही दिले आहे. कॅप्शनमध्ये ती म्हणते की, “Moving on and beyond !!!”
Karishma Tanna
अशी आहे करिश्माची पर्सनल लाईफ
करिश्मा तन्ना स्वत:ला फिट ठेवण्यासाठी खूपच मेहनत घेताना दिसते. वर्कआऊट करत तिने स्वत:ला मेंटेन केले आहे. करिश्मा एक फिटनेस फ्रीक आहे. करिश्माच्या पर्सनल लाईफबद्दल सांगायचे झाले तर, करिश्मा तन्ना उपेश पटेलसोबत रिलेशनशिपमध्ये होती. या दोघांचीही भेट बिग बॉस 8 मध्ये स्पर्धक म्हणून झाली होती. तेथेच त्यांची जवळीक वाढली. दोघांनी दोन वर्ष एकमेकांना डेट केलं. त्यानंतर दोघेही वेगळे झाले.
 Karishma Tanna
करिश्माच्या करिअरविषयी थोडक्यात…
करिश्माच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, क्यों की सास भी कभी बहू थी या मालिकेने तिने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. एकता कपूरच्या नागिन 3 मालिकेतही करिश्माला आपण पाहिले आहे. यात तिने नागिनची भूमिका साकारली होती. कयामत की रात यांसारखे सुपरनॅचरल शोही तिने केले आहेत. ती कॉमेडी शो आणि डान्स रिअ‍ॅलिटी शोमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. करिश्माने सिनेमातही आपले नशीब आजमावले आहे. संजू या सिनेमातही ती दिसली आहे. याशिवाय ग्रँड मस्ती या अ‍ॅडल्ट कॉमेडी सिनेमातही तिने काम केले आहे.
 Karishma Tanna

 

आरोग्यविषयक वृत्त –

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स
कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा
योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा