Karishma Tanna | पुन्हा एकदा करिश्मा तन्नाच्या ‘त्या’ फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अभिनेत्री करिश्मा तन्ना (Karishma Tanna) नेहमीच तिच्या अभिनयामुळे चर्चेत असते. करिश्माने आजवर तिच्या अभिनयाच्या जोरावर अनेक हिट चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. करिश्मा सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रिय असते. नुकतेच तिने बेडरूम मधील तिचे काही लूक शेअर केले आहेत. तिचे हे साधे लूक देखील सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. करिश्माने (Karishma Tanna) आजवर अनेक चित्रपटात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे.

करिश्माने शेअर केलेल्या फोटोमुळे चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढलेले दिसत आहेत. करिश्माचे लेटेस्ट फोटो मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये करिश्माने कॅज्युअल कपडे परिधान केले आहे. यावेळी तिने ब्लु डेनेम जीन्स आणि स्काय ब्लू कलरचा स्वेट शर्ट घातला आहे. केस कर्ल करत तिने सिम्पल मेकअप केला आहे. या फोटोमध्ये तिने तिच्या बेडवर बसून एकापेक्षा एक पोजेस दिले आहेत. सध्या करिश्माचे हे फोटोज सोशल मीडियावर वाऱ्यासारखे वाहत आहेत. या फोटोमध्ये करिश्मा खूपच आनंदी आणि आरामशीर बसलेली दिसत आहे. करिश्माचा हा सिम्पल लूक देखील चाहत्यांना खूपच भावला आहे.

करिश्मा (Karishma Tanna) आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. ती सोशल मीडियावर तिचे वेगवेगळे लूक नेहमीच शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने लॉंग ब्लेझर मधील लुक शेअर केला होता. त्या फोटोवर देखील चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला होता. त्यानंतर आता या बेडरूमच्या फोटोवर देखील चाहते भरभरून प्रेम दाखवताना दिसत आहेत. करिश्माच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास ती नुकतीच ॲमेझॉन प्राईम वरील ‘हुश हुश’ या वेब सिरीज मध्ये दिसली होती. या वेब सिरीज मध्ये करिश्माने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका उत्तमरीत्या साकारून प्रेक्षकांकडून वाहवाई मिळवली होती. त्यामुळे पुन्हा एकदा करिश्माला पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

 

Web Title :- Karishma Tanna | television actress karishma tanna shared new look from bedroom see her photos here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

U19 Womens World Cup | सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा धुव्वा उडवत टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Advay Hire | शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करताच अद्वय हिरे यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले…

CM Eknath Shinde | आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ४ ते ६ जागा राखता आल्या तरी पुरेसं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे