24 वर्षांनंतर आमिरसोबतच्या ‘किसिंग’ सीनबद्दल करिश्मा कपूरनं सोडलं ‘मौन’, सांगितलं ‘हे’ सिक्रेट

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार करिश्मा कपूर हिनं अनेक सुपरहिरट सिनेमात काम केलं आहे. दीर्घकाळापासून सिल्वर स्क्रीनपासून दूर असणारी करिश्मा कपूर लवकरच आपला डिजिटल डेब्यू करणार आहे. मेंटल हुड या आगामी वेबसीरिजमध्ये करिश्मा लिड रोल करणार आहे. या डिजिटल डेब्यू आधी करिश्मानं असं काही सांगितलं आहे ज्यानं सारेच चकित झाले. मेंटल हुडच्या प्रमोशनदरम्यान तिनं 24 वर्षांपूर्वी आलेल्या तिच्या आणि आमिर खानच्या राजा हिंदुस्तानी या सिनेमातील किसिंग सीनबद्दलचं सिक्रेट सांगितलं आहे.

https://www.instagram.com/p/BzEC_UMnoHP/

करिश्मानं सांगितलं की, या सिनेमातील त्यांच्या अनेक आठवणी आहेत. परंतु जेव्हा राजा हिंदुस्तानी हा सिनेमा आला तेव्हा लोकांमध्ये किसिंग सीनमुशळे जास्त चर्चेत राहिला. खूप कमी लोकांना माहिती आहे की, हा किसिंग सीन करताना मी थरथर कापत होते. हा सीन शुट करण्यासाठी आम्ही तीन दिवसांचा वेळ घेतला होता.”

https://www.instagram.com/p/B8LiSD-n5FX/

करिश्मा म्हणाली, “हा किसींग सीन कधी संपेल असं मला झालं होतं. कारण फेब्रुवारी महिना होता. आम्ही उटीमध्ये शुटींग करत होतो. शुट करताना आम्ही अक्षरश: गोठत होतो. सायंकाळी 6 वाजता हा सीन शुट केला गेला. थंडीमुळं मी थरथर कापत होते.”

https://www.instagram.com/p/B7x37PRBj8H/

करिश्मा कपूर 90 च्या दशकातील सुंदर, टॅलेंटेड आणि बोल्ड अ‍ॅक्ट्रेस आहे. 90 च्या दशकात करिश्माचा इंडस्ट्रीत बोलबाला होता. 1996 साली आलेला राजा हिंदुस्तानी हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. धर्मेश दर्शन यांनी हा सिनेमा डायरेक्ट केला होता. या सिनेमात करिश्मा कपूर आणि आमिर खान यांचा लिपलॉक किसींग सीन आहे. त्यावेळी हा सीन खूपच चर्चेत राहिला आहे. आजही चाहत्यांना हा सीन आठवतो.