कडाक्याची थंडी, मुसळधार पाऊस, थरथरणार्‍या करिश्मा कपूरनं दिला होता ‘बोल्ड’ किसिंग सीन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार करिश्मा कपूर दीर्घकाळापासून सिल्वर स्क्रीन पासून दूर आहे. आपल्या लुकमुळं ती अनेकदा चर्चेत आली आहे. करिश्मा कपूर सध्या आपली आगामी वेब सीरिज ‘मेंटल हुड’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत तिनं राजा हिंदुस्तानी या सिनेमाच्या शुटींगच्या आठवणी सांगितल्या आहेत. तिनं सिनेमातील लिड ॲक्टर आमिर खानवरही खुलून भाष्य केलं आहे.

https://www.instagram.com/p/BzEC_UMnoHP/

1996 साली रिलीज झालेल्या राजा हिंदुस्तानी या सिनेमात करिश्मा कपूर आणि आमिर खान यांचा लिपलॉक किसींग सीन आहे. त्यावेळी हा सीन खूपच चर्चेत राहिला आहे. आजही चाहत्यांना हा सीन आठवतो.

https://www.instagram.com/p/B8LiSD-n5FX/

मुलाखतीत बोलताना करिश्मा म्हणाली, “फेब्रुवारी महिना होता. आम्ही उटीमध्ये शुटींग करत होतो. आमच्या अनेक आठवणी आहेत. हा सीन शुट करण्यासाठी आम्ही तीन दिवसांचा वेळ घेतला होता. हा किसींग सीन कधी संपेल असं आम्हाला वाटत होतं. भयंकर थंडीत आणि गार हवेत आम्ही सीन करत होतो तेही फेब्रुवारीत.”

पुढे बोलताना करिश्मा म्हणाली, “हा सीन शुट करण्यासाठी थंडीत सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत आम्ही शुटींग करत होतो. थंडी एवढी होती की, अंग थरथर कापायचं. मला वाटतं की, अशा परिस्थितीत काम करण्याचा एक वेगळाच काळ होता.” हा सिनेमा सुपरहिट झाला होता.

https://www.instagram.com/p/B7x37PRBj8H/