home page top 1

अभिनेत्री करिश्मा कपूरने ‘६ वी’तच सोडले ‘शिक्षण’, अशी होती तिची ‘लव्ह लाईफ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कपूर कुटुंबाची लाडकी आणि बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरने आपल्या करिअरमध्ये अनेक सिनेमे केले आहेत, त्यातील अनेक सिनेमांना यश मिळालं आहे. 90 च्या दशकातील बेस्ट अॅक्ट्रेसमध्ये करिश्माच्याही नावाचा समावेश आहे. त्यावेळी बॉलिवूडमध्ये करिश्मा पॉप्युलॅरिटी शिखरावर होती. तिने सलमानसहित अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. तिच्या पाऊलावर पाऊल टाकत तिची लहान बहिण करिनाही चालली होती. करिश्माबद्दल अनेक अशा गोष्टी आहेत ज्या क्वचितच तुम्हाला माहिती असतील.

करिश्माने सहावीतच सोडली शाळा
करिश्माचा जन्म 25 जून 1974 रोजी मुंबईत झाला होता. बॉलिवूड अॅक्टर रणधीर कपूर आणि बबिताची ती मुलगी आहे. जुन्या जमान्यातील राज कपूर यांची ती नात आहे. तर पृथ्वीराज कपूर यांची ती पणतू आहे. तिची आई बबिताने हॉलिवूड अॅक्ट्रेस जीना लोलोब्रिगिडाच्या नावावरून तिचे नाव लोलो ठेवले होते. करिश्मा आणि करीना या दोघी बहिणींनी तिची आई बबिता यांनी सांभाळले आहे. तिने सहावीत असतानाच शाळा सोडली होती.

बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणारी कपूर कुटुंबातील पहिली मुलगी
वयाच्या 17 व्या वर्षी प्रेम कैदी या सिनेमातून आपला अॅक्टींग डेब्यू केला होता. करिश्मा, कपूर कुटुंबातील पहिली मुलगी आहे जिने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं. त्यांच्या कुटुंबात त्यावेळी महिलांनी सिनेमात काम करण्याची प्रथा नव्हती. त्यांना असं वाटायचं की, यामुळे महिला बाकी जबाबदारी पार पाडू शकणार नाहीत. यामुळेच करिश्माच्या आईवडिलांमध्ये भांडणही झालं होतं. त्यानंतर 1988 मध्ये ते वेगळे झाले होते. अनेक वर्ष वेगळे राहिल्यानंतर 2007 मध्ये ते पुन्हा एकत्र आले.

‘या’ सिनेमाने करिश्माला मिळाली ओळक आणि अॅवार्ड्स
राजा हिंदुस्तानी या सिनेमातून तिला खरी ओळख मिळाली होती. आमिर खानसोबत तिची केमिस्ट्री पाहण्यालायक होती. करिश्माने गोविंदा आणि सलमानसोबत अनेक हिट सिनेमे दिले आहेत. हिरो नंबर 1, कुली नंबर 1, बीवी नंबर 1 या सिनेमातून ती बॉलिवूडची क्वीन झाली. दिल तो पागल है या सिनेमासाठी तिला बेस्ट सपोर्टीव अॅक्ट्रेसचा अॅवार्ड मिळाला होता. याशिवाय तिला राजा हिंदुस्तानी आणि फिजा या सिनेमासाठी बेस्ट अॅक्ट्रेसचा फिल्म फेअर अॅवार्ड मिळाला होता. याशिवाय तिला तिच्या अनेक रोलसाठी नॉमिनेशन्सही मिळाले आहेत.

करीश्माने केलेल्या मालिका
सिनेमांव्यतिरीक्त तिने अनेक टीव्ही मालिकेतरही काम केले आहे. 2003 साली आलेल्या करिश्मा- द मिरॅकल्स ऑफ डेस्टिनी या मालिकेतही तिने काम केले आहे. याशिवाय तिने आता डिजिटल क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. Alt बालाजीच्या मेंटलहुड या वेबसीरीजमध्येही तिने काम केले आहे.

करिश्माने नाकाराल्या ‘या’ मोठ्या भूमिका
अनेकांना हे माहीत नसेल परंतु करिश्माने अनेक मोठे रोल्सही नाकारले आहेत. त्यात कुछ कुछ होता है मधील टीना आणि इश्क यांसारख्या सिनेमाचे नाव आहे. करिश्माने 2012 मध्ये आलेल्या बॉडीगार्ड सिनेमात आपली बहिण करीनाला आवाज दिला आहे.

अशी आहे करिश्माची लवलाईफ
मीडिया रिपोर्ट्सनुसार, करिश्मा 1992 मध्ये अजय देवगनसोबत नात्यात होती. या नात्याचा शेवट 1995 मध्ये झाला. यानंतर तिने 2002 साली अभिषेक बच्चन सोबत साखरपुडा केला होता जो काही काळाने तुटला.

29 सप्टेंबर 2003 मध्ये तिने संजय कपूरसोबत लग्न केलं. या दोघांना मुलं आहेत. मुलीचं नाव समाइरा आणि मुलाचं नाव किआन आहे. 2014 मध्ये दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. 2016 मध्ये दोघेही वेगळे झाले. सध्या ती तिचा कथित प्रियकर बिजनेसमन संदीप तोषनीवालसोबत नात्यात आहे.

Loading...
You might also like