प्रेयसीला त्रास दिला म्हणून प्रियकराने केला ‘त्या’ मुलाचा खून

कर्जत :पोलीसनामा ऑनलाईन-प्रेयसीला त्रास देत असल्याने प्रियकराने त्या त्रास देणाऱ्या मुलाचा खून केल्याची घटना मुंबई  जवळील नेरूळ येथे घडली आहे. पोलिसांनी प्रेयसीला प्रियकराला आणि त्यांच्या एका साथीदाराला अटक केली असून त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या घटनेने नेरुळ परिसरात सनसनाट पसरली आहे.

१३ ऑक्टोबर पासून गायब असलेल्या  नंदू कालेकर याचा मृतदेह दामत येथील रेल्वे पटरी नजीक असेलेल्या  क्रिकेट मैदानाच्या कडेला कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे. आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना पोलीस कोठडी न्यायालयाकडून मागून घेतली त्यानंतर त्यांनी पहाटे खुनाची कबुली दिल्यानंतर  पोलिसांनी त्यांना मृतदेह लपवलेल्या ठिकाणी घेऊन  गेले असता  नंदूला एक महिन्यापूर्वीच ठार करून क्रिकेट मैदाना शेजारील उंच वाढलेल्या गवतात हा मृतदेह लपवल्याचे सत्य प्रकाशात आले आहे. खून महिनाभरापूर्वी झाल्याने त्या मृतदेहातून उग्र वास येत असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले तसेच तो मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

कुमारी निशा विरले (वय २२) तलवंडे ता .कर्जत आणि अनिल राऊत (वय २७) रा . बोर्ले ता कर्जत  या दोघांचे प्रेमसंबंध होते. नंदू कालेकर (वय २६) रा. वंजारपाडा  हा निशाला त्रास देत होता  त्याच्या त्रासाला कंटाळलेल्या निशाने हि हकीकत तिच्या प्रियकराला सांगितली. अनिल राऊत, निशा विरले या जोडप्याचा एक मित्र मंगेश भवारे रा . मोहाची वाडी, नेरुळ  तिघांनी नंदूच्या खुनाचा कट आखला. त्यांच्या कटानुसार नंदूला साखर पेरणी करून निशाने दामत येथील रेल्वे पटरी नजीक असेल्या  क्रिकेट मैदानाच्या निर्जन भागात बोलावून घेतले . ठरल्या प्रमाणे निशाने नंदूला शीतपेयातून विषारी औषध पाजले त्यानंतर नंदू बेशुध्द झाला त्यानंतर निशाच्या ओढणीने अनिल आणि मंगेशने  नंदूचा गळा आवळला. नंदूचा जीव गेल्याची खात्री झाल्यावर त्यांनी मैदाना शेजारी  वाढलेल्या दाट गवतामध्ये त्याचा मृतदेह फेकून दिला.

नंदू गायब होताच त्याच्या गायब झाल्याची फिर्याद पोलिसात देण्यात अली होती परंतु त्यांच्या तपासाचे कोणतेच लीड पोलीसांना मिळत नव्हते त्यानंतर पोलिसांनी नंदूच्या फोनच्या लोकेशनवरून त्याच्या खुनाचा बारीक सुगावा लावला त्यानंतर पोलीसांनी खटल्याच्या बारीक कड्या जोडण्याचा प्रयत्न केला.  पोलिसांनी त्याचा मोबाईल ज्या क्षेत्रात अॅक्टिव्ह होता त्याभागात पोलीसांनी त्याच्याविषयी चौकशी केली तेव्हा तो एका मुलीची छेड  काढत असल्याचे समजले तेव्हा पोलीसांनी त्यामुलीला शोधून काढले तेव्हा त्या मुलीच्या वागण्यातून पोलीसांचा संशय बळावला आणि पोलीस तपासात लीड घेऊन या खुनाचा तपास पूर्ण केला.

You might also like