कर्जतचे पोलीस निरीक्षक वसंत भोये यांची तडकाफडकी बदली

नगर : पोलीसनामा ऑनलाईन

 

कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत भोये यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून कर्जत पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक वसंत भोये यांची तडकाफडकी बदली केल्यामुळे नगर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. भोये यांची बदलीचे कारण : कर्जतचे पोलीस निरीक्षक वसंत भोये यांनी रुग्णनिवेदक (सिक) रजेसाठी अर्ज केला होता. नगर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेता पोलीस अधिका-यांनी कोणतीही रजा घेऊ नये असा आदेश नगरचे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी यापूर्वी दिला होता. पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला बगल दिल्याने त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
You might also like