Karlyache Fayde | आजारांनी तुम्हाला त्रस्त केलेय का? सुरू करा कारल्याचे सेवन, मग पहा; होईल चमत्कार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Karlyache Fayde | कारल्याचे नाव जरी काढले तरी अनेकांच्या तोंडाची चव बिघडते. पण कारले आयुर्वेदिक गुणधर्मांची खाण आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल. कारल्यामध्ये कॉपर, व्हिटॅमिन बी, अनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड (Copper, Vitamin B, Fatty Acids) यांसारखे अनेक पोषक घटक असतात. त्यात भरपूर अँटी व्हायरल आणि अँटी बायोटिक गुणधर्म (Anti-viral, Anti-biotic properties) आहेत. कारले शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासोबतच रक्त स्वच्छ करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. कारल्याचे इतर कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात. (Karlyache Fayde)

 

1. तोंडाच्या फोडांवर रामबाण उपाय
जर तोंडात फोड आले असतील तर त्यासाठी कारले रामबाण उपाय आहे. कारल्याच्या पानांचा रस काढा. यानंतर त्यात थोडी मुलतानी माती मिसळून पेस्ट बनवा. त्यानंतर ह ही पेस्ट तोंडाच्या फोडांवर लावा. जर मुलतानी माती मिळत नसेल तर कापूस कारल्याच्या रसात बुडवून फोड आलेल्या भागावर लावा. काही काळानंतर तोंडाचे व्रण (Mouth ulcers) हळूहळू बरे होतील. (Karlyache Fayde)

 

2. वजन नियंत्रित ठेवण्यास करते मदत (Weight control)
ज्या लोकांचे वजन सतत वाढत आहे आणि विविध उपाय करूनही ते कमी होत नाही, तर कारल्याचा आयुर्वेदिक उपाय करू शकता. डॉक्टरांच्या मते, कारल्यामध्ये लठ्ठपणाविरोधी (Obesity) म्हणजेच चरबी कमी (Low Fat) करणारे घटक आढळतात. याच्या सेवनामुळे माणसाची चरबी नियंत्रणात राहते आणि वजन वाढत नाही.

3. लिव्हरला फॅटी होण्यापासून वाचवते
लिव्हरच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांसाठी कारल्याचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते. संशोधनात असे दिसून आले आहे की कारल्यामध्ये हेपॅटोप्रोटेक्टिव्ह नावाचे तत्व असते, जे लिव्हरचे रक्षण करण्याचे काम करते. जेव्हा लिव्हर फॅटी होऊ लागते, तेव्हा कारल्यातील हा घटक चरबीचा प्रसार रोखण्यास मदत करतो. त्यामुळे फॅटी लिव्हर, लिव्हर कॅन्सर (Liver Fatty, Liver Cancer) यांसारख्या आजाराचा धोका कमी होतो, व्यक्ती तंदुरुस्त राहते.

 

4. डायबिटीजमध्ये कारले अमृत
मधुमेहाचा (Diabetes) त्रास असलेल्या लोकांसाठी कारले अमृतसारखे आहे. वास्तविक, कारल्याचे सेवन शरीराच्या विशिष्ट भागाला किंवा ऊतींना लक्ष्य करत नाही तर संपूर्ण शरीरात ग्लुकोज मेटाबॉलिज्म राखण्यास मदत करते. कारल्यामध्ये इन्सुलिनसारखी अनेक रसायने आढळतात, जी शरीरातील शुगर लेव्हल नियंत्रित (Sugar level control) ठेवण्यास मदत करतात. यामुळेच शुगरचा त्रास असलेल्या रुग्णांनी कारले खावे.

 

5. पोटदुखीवर खूप फायदेशीर
ज्या लोकांचे अनेकदा पोट बिघडते किंवा अ‍ॅसिडिटी आणि जळण्याची समस्या असते.
अशा लोकांसाठी कारल्याचे सेवन खूप फायदेशीर ठरते. कारल्याचा प्रभाव थंड मानला जातो.
यामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन आणि मॅग्नेशियम सारख्या गोष्टी असतात,
जे शरीराला थंड आणि तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात. यामुळेच डॉक्टर उन्हाळ्यात कारल्याची भाजी खाण्याचा सल्ला देतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Karlyache Fayde | Karlyache Fayde bitter gourd health benefits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coconut Water | रात्री नारळपाणी प्यायल्याने होतील ‘हे’ 5 आणखी वेगळे फायदे, आजपासून सुरू करा सेवन

 

High Cholesterol | ‘हे’ ड्रिंक गरम करून पिण्याने कमी होईल कोलेस्ट्रॉल, शरीराला होतील 8 जबरदस्त फायदे

 

Pune PMC News | टिळेकरनगर येथील सिंहगड सिटी स्कूलच्या आठमुठ्या भुमिकेमुळे कात्रज- कोंढवा रस्त्याच्या तिढा वाढला !