वाल्हे येथे कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाईन – (संदीप झगडे) : वाल्हे येथील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी वाल्मीकी विद्यालयाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३२ जयंतीनिमित्त पारंपरिक ढोल, लेझीमच्या तालावर गावांतर्गत मरवणूक काढण्यात आली. या वेळी संस्थेच्या संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन, पुणे जिल्हा बँकेचे संचालक रयत शिक्षण संस्थेचे सल्लागार समितीचे सदस्य प्रा . डॉ . दगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते करण्यात. या वेळी माजी सभापती गिरीश पवार, प्राचार्य अंकुश साळुखे, पर्यवेक्षक बाबासाहेब कुंभार, प्रमोद शहा, एस . एच . गंभीर, नाना सस्ते, प्रा . संतोष नवले, पिसुर्टीचे माजी सरपंच अशोक बरकडे, सतीश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी आकर्षक फुलांची सजावट, तसेच रंगीबेरंगी पताका व फुग्यांची सजावट केलेल्या टॅक्टरमधून कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी महात्मा फुले यांच्या पुतळ्याला प्राचार्य साळुके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. या वेळी गावचे सरपंच अमोल खवले यांनी प्रतिमेचे पूजन केले.

मिरवणूक बाजारपेठेत आल्यानंतर मुलींच्या टिपरीच्या पथकाने स्वावलंबी शिक्षणावरील पथनाट्य, तसेच मुलांनी लेझीम व झांज पथकाचे खेळ सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. या वेळी बी. जगताप , हरिश्चंद्र भालिंगे, विशांत ठाकूर, ममता देसाई, आम्रपाली गडवे आदींनी पथकासाठी मार्गदर्शन केले. मिरवणुकीनंतर महर्षी वाल्मीकी ढोल पथकाच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले.