इंदापूर महाविद्यालयात ‘कर्मयोगी’ व्याख्यानमाला

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये कर्मयोगी शंकररावजी बाजीराव पाटील यांच्या 13 व्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी 13 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी साडेनऊ वाजता कर्मयोगी व्याख्यानमाला आयोजित केली आहे. अशी माहिती संस्थेचे सचिव मुकुंद शहा आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी दिली.

कर्मयोगी व्याख्यानमाला अंतर्गत प्रसिद्ध हास्यसम्राट दीपक देशपांडे यांचे ‘हास्यकल्लोळ’ तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांचे ‘युवा भान: युवा चेतना’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले उपस्थित राहणार आहेत.

श्रद्धेय कर्मयोगी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. तालुक्यातील अनेक नागरिक महाविद्यालयातील त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन या व्याख्यानाचा लाभ घेत असतात. व्याख्यानमालेला उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

आरोग्यनामा ऑनलाइन –