कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्यास राज्यस्तरीय ऊर्जा बचत पुरस्कार जाहीर

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – इंदापूर तालुक्यातील महात्मा फुलेनगर, बीजवडी येथील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यास सन २०१८-१९ वर्षातील महाराष्ट्र राज्य एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (मेढा) यांचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचा सहविजननिर्मिती प्रकल्प १९.५ मेगावॅट व डिस्टिलरी (आसवानी प्रकल्प) ३० हजार लिटर प्रतिदिनी क्षमतेचा असून कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता ८ हजार मेट्रिक टन अशी आहे. महाराष्ट्र राज्य विज महामंडळ यांना सध्या दररोज ७.६६ मेगावॅट वीज विक्री करण्यात येत आहे. सन २०१९-२० सगळ्यात हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्ष पदमा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

सन २०१९-२० कर्मयोगी कारखान्यास पुरस्कार मिळण्याकरिता कार्यकारी संचालक बाजीराव सुतार , कामकाज व्यवस्थापक ए. सी. पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २१.११.२०१९ रोजी सादरीकरण केल्यानंतर कर्मयोगीस दि. ३.१२.२०१९ रोजी मेढा कडून सन २०१८-१९ साठी राज्यस्तरीय ऊर्जा बचतीचे प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याचे जाहीर केले आहे .कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यामध्ये ऊर्जाबचत करण्यासाठी कारखान्यांमधील इलेक्ट्रिकल बल्ब एलईडी बसवण्यात आले असून सहविज निर्मिती प्रकल्पाचे बॉयलरच्या इकॉनोमायझरचे आधुनिकीकरण केल्यामुळे मेकॅनिकल सक्युलेटर बसवली आहे. त्यामुळे बचत झाली असून बगॅस मध्येही ९६१३ मेट्रिक टनाची बचत झाली असुन सन २०१८-१९ ऊर्जाबचत कार्डचे वितरण लवकरच होणार आहे अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी दिली.

तसेच कारखान्याचा चालू गळीत हंगाम सुरळीतपणे आणि पूर्ण क्षमतेने सुरू राहण्यासाठी सर्व ऊस उत्पादक व वाहतूकदार यांनी सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे वतीने करण्यात आले आहे. यावेळी कारखान्याचे संचालक भरत शहा, वसंत मोहोळकर, भास्कर गुरगुडे, विष्णू मोरे, हनुमंत जाधव, मच्छिंद्र अभंग, अंकुश काळे, सुभाष काळे, प्रशांत सूर्यवंशी, यशवंत वाघ, मानसिंग जगताप, राजेंद्र गायकवाड, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, केशव दुर्गे, अतुल व्यवहारे, राजेंद्र चोरमले, पांडुरंग गलांडे, सुभाष भोसले, संचालिका जयश्री नलवडे, तसेच कार्यकारी संचालक बाजीराव सुतार आणि सर्व विभाग व खातेप्रमुख प्रमुख उपस्थित होते.

Visit : policenama.com