कर्मयोगीची एफआरपीची संपूर्ण रक्कम जमा : हर्षवर्धन पाटील

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन(सुधाकर बोराटे) – कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाण्याने सन २०१८-१९ या हंगामातील गाळप झालेल्या उसाची उर्वरित एफआरपीची संपूर्ण रक्कम सभासदांच्या खात्यावर जमा करित असल्याची माहिती कर्मयोगीचे अध्यक्ष व माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील व उपाध्यक्षा पदमाताई भोसले यांनी इंदापूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

कर्मयोगी कारखाण्याने मागील २०१८-१९ या हंगामात १० लाख ४८ हजार २१६ टणाचे गाळप केलेले होते. सदर गाळप उसासाठी कर्मयोगीने अत्तापर्यंत एफआरपी पोटी २३५ कोटी ८५ लाख इतकी रक्कम सभासदांना अदा केलेली आहे. व राहिलेली ऊर्वरित रक्कम आज वर्ग करीत असुन या आठवड्यात बँकाना सलग सुट्या असल्याने सभासदांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास एखाद दिवस उशिर होण्याची शक्यता असल्याची माहीती हर्षवर्धन पाटील यांनी दीली.

कर्मयोगी कारखाण्याला केंद्र शासनाच्या नियमानुसार मागील हंगामात उत्पादीत झालेल्या साखरेपैकी कारखाना व थर्ड पार्टी कोट्यानुसार ४ लाख ७० हजार ८८० क्विटंल साखर परदेशात निर्यात करावी लागली. सदरची साखर निर्यात केल्यामुळे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ लि. नवी दिल्ली यांचे देशपातळीवरील दूसर्‍या क्रमांकाचे पारीतोषिक कर्मयोगी साखर कारखाण्यास मिळाले आहे. त्याचा बक्षिस वितरण समारंभ नवी दिल्ली येथे दि. २८ ऑगष्ट रोजी होणार आहे. ऊस बिलाबरोबरच कारखाण्याच्या ऊस तोडणी वाहतुकदारांच्याही रक्कमा लवकरच संबधीतांना वर्ग करित असल्याची ग्वाही हर्षवर्धन पाटील व पदमाताई भोसले यांनी दीली.

कर्मयोगीच्या आगामी २०१९-२० मधील गाळप हंगामासाठीची ऑफ सिझनमधील कामाची तयारी, प्रगती पथावर आहे. मागील दोन वर्षापासुन तालुक्यामध्ये अत्यल्प पाऊस झाल्याने तसेच कालव्याचे पाणी उस उत्पादकांना न मिळाल्यामुळे येणार्‍या गाळप हंगामासाठीचे उसाची ऊपलब्धता कमालीची घटलेली आहे. तसेच जनावरांच्या छावणीसाठी ऊसाचा पुरवठा झालेने त्याचाही परिणाम ऊसाच्या उपलब्धतेवर होणार आहे. तरी ही येणार्‍या हंगामामध्ये निर्धारित वेळेत गाळप हंगाम सूरू करून कमीत कमी कालावधीमध्ये सभासदांच्या संपूर्ण ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट कारखाण्याने ठेवले आहे.

येणार्‍या हंगामामध्ये ऊसाची उपलब्धता कमी असल्याने ऊस उत्पादकांना आपला सर्वच्या सर्व ऊस कर्मयोगी कारखाण्यास गाळपास देणेचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी कारखाण्याचे सर्व संचालक भरत शहा, भास्कर गुरगुडे, विष्णू मोरे, हणूंत जाधव, मच्छींद्र अभंग, अंकुश काळे, अतुल व्यवहारे, वसंत मोहळकर, सुभाष काळे, प्रशांत सुर्यवंशी, रमेश जाधव, यशवंत वाघ, मानसिग जगताप, राजेंद्र गायकवाड, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, केशव दुर्गे, राजेंद्र चोरमले, संचालीका जयश्री नलवडे, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार व सर्व खाते, विभागप्रमुख उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त –