कर्नाटकात पंतप्रधान मोदीनी काँग्रेसचे काढले वाभाडे

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण बरेच तापलेले आहे.भाजपने निवडणुकीसाठी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदीनी कर्नाटकातील विविध ठिकाणी सभेत बोलताना काँग्रेसवर अक्षरश: हल्ला चढवला. काँग्रेस दलित आणि मुसलीमांच्या नावावर राजकारण करण्यात पटाईत आहे. या सरकाराचे नाव “रुपया “सरकार असेच म्हणावे लागेल . बिदरमध्ये दलित मुलीचा छळ झाला तेव्हा काँग्रेसच्या कँडल कुठे गेल्या होत्या? असे बरेच आरोप कर्नाटकातील सभांमध्ये बोलताना पंतप्रधान मोदी यांनी केले .

ही निवडणूक कर्नाटक विधानसभेचे भविष्य निश्चित करेल. फक्त आमदारांची निवड करण्यापुरती ही निवडणूक आहे असे समजू नका. महिला सुरक्षा, शेतकऱ्यांचा विकास हे मुद्दे महत्वाचे आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी कलाबुर्गी येथील जाहीर सभेत म्हणाले.

कलबुर्गी
येथील सभेत बोलताना आपल्या भाषणातून मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.आपल्या जवानांनी जे बलिदान दिले त्याबद्दल काँग्रेसला अजिबात आदर नाहीय. जेव्हा आपल्या सैनिकांनी सर्जिकल स्ट्राईक केला तेव्हा काँग्रेसने त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते माझ्याकडे सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत होते असे मोदी म्हणाले. कर्नाटकाला शौर्याची परंपरा आहे. पण फिल्ड मार्शल करीअप्पा आणि जनरल थिमय्या यांना काँग्रेसने कशी वागणूक दिली ?

पाकिस्तानचा 1948 मध्ये पराभव केल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि संरक्षण मंत्री कृष्णा मेनन यांनी जनरल थिमय्या यांचा अपमान केला होता असा दावा मोदींनी केला. सर्जिकल स्ट्राईकनंतर काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते आपल्या लष्कर प्रमुखांना ‘गुंड’ म्हणाले होते असा आरोप मोदींनी केला. सर्जिकल स्ट्राईकसाठी जाताना आपल्या जवानांनी बंदुका नव्हे कॅमेरा घेऊन जावे असे काँग्रेसला वाटते. ‘वंदे मातरम’च्यावेळी मंचावर त्यांचे स्वत:चे वरिष्ठ नेते कसे वागत होते त्यावर मोदींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

काँग्रेसने मागच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांना मुख्यमंत्री बनवण्याचे आश्वासन दिले होते. पण त्यांनी दलित समाजाची दिशाभूल केली. राजकारण करण्याची काँग्रेसची ही पद्धतच आहे असेही मोदी म्हणाले. दिल्लीमध्ये कँडल मार्च काढणाऱ्या काँग्रेसला मला विचारायचे आहे. बिदरमध्ये जेव्हा दलित मुलीचा छळ झाला तेव्हा तुमच्या कँडल कुठे गेल्या होत्या? अशी टीका मोदींनी केली.

बेल्लारी
येथील सभेत बोलताना मोदींनी भाषणाची सुरुवात कन्नड भाषेतून केली. येथून निवडून आल्यानंतर सोनिया गांधींनी तीन हजार करोडचे पॅकेज देण्याचे जाहीर केले होते. त्याचे काय झाले असा सवाल मोदींनी बेल्लारी येथील सभेत बोलताना केला. काँग्रेस सरकारने कर्नाटकमध्ये अवैध खाणकाम थांबवण्याच्या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केला. इथे उपस्थित लोकांचा उत्साह पाहून काँग्रेसचा शेवटचा बालेकिल्ला देखील उध्वस्त होईल असे मोदी म्हणाले. बेल्लारीचा विकास झाला तर कर्नाटकचा विकास होईल आणि कर्नाटकचा विकास झाला तर देशाचा विकास होईल असे मोदीजी बेल्लारी येथील सभेला उद्देशून म्हणाले.

काँग्रेसवर आरोप करताना ते म्हणाले की,” काँग्रेसच्या राज्यात छोट्यातील छोटे काम हे पैसे देऊन करावे लागते त्यामुळे या सरकाराचे नाव “रुपया “सरकार असेच म्हणावे लागेल. काँग्रेस दलित आणि मुसलीमांच्या नावावर राजकारण करण्यात पटाईत आहे. असा सरळ आरोप मोदींनी काँग्रेसवर केला.”

राज्यात मोदींच्या प्रचारासाठी रॅलीची संख्या देखील वाढवण्यात आली होती. गुरुवारी पंतप्रधान मोदींच्या तीन रॅलीचे नियोजन होते. आज त्यांनी पीएम कलबुर्गी, बेल्लारी आणि बंगळूर मध्ये रॅली आणि सभा घेतली. प्रचारासाठी यापूर्वी १५ रॅली नियोजित केल्या होत्या मात्र आता स्थानिक नेत्यांच्या मागणीनुसार २१ रॅली काढल्या गेल्या.

राहुल गांधींचे प्रत्युत्तर 
मोदीना प्रत्युत्तर देताना राहुल गांधी ओराद येथील सभेत बोलताना म्हणाले की,”मोदी जेव्हा घाबरतात तेव्हा ते वैयक्तिक हल्ला करतात. तुम्ही पंतप्रधान आहात पण ही बोलण्याचे पद्धत ठीक नाही. कर्नाटकातील सभेत त्यांनी मोठे भाषण दिले ,भ्रष्टाचाराविषयी ते बोलले पण निरव मोदी आणि अमित शहा यांच्या पुत्राविषयी ते बोलले नाहीत . माझी जितकी चेष्टा करायची आहे तितकी करा पण माज्या प्रश्नांची उत्तरे द्या असे राहुल गांधी म्हणाले.

राज्य कृषी क्षेत्रातल्या सध्याच्या स्थितीसाठी राहुल गांधींनी मोदीना ‘एफ ग्रेड’ दिला. तसेच प्रधानमंत्री शेतकरी विमा योजनेमुळे शेतकरी सुखी नाही तर त्रस्त आहेत. उलट खाजगी विमा क्षेत्रातील कंपन्याच फायद्यामध्ये आहेत.