मुलगा गेल्याचे दुःख, पण ऊर अभिमानाने भरलाय, शहीद कर्नल बाबू यांची आई भावनिक

पोलीसनामा ऑनलाइन टीम – चीनशी झालेल्या संघर्षात प्रत्यक्ष ताबारेषेवर शहीद झालेले कर्नल संतोष बाबू यांच्या आईने तमाम भारतीयांना अभिमान वाटावा अशी प्रतिक्रिया दिली आहे. मुलगा शहीद झाला याचे वृत्त आल्यानंतर कर्नल संतोष यांच्या आई मोठ्या धीराने दु;खाला सामोर्‍या गेल्या आहेत. माझा मुलगा मी गमावला याचे मला दु;ख आहे. पण देशासाठी त्याने प्राणाची आहुती दिली, याचा मला अभिमान आहे. अशी भावनिकता त्यांनी बोलून दाखविली आहे.

भारत-चीन दरम्यान सोमवारी रात्री सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असताना चीनने आगळीक करून भारतीय सैनिकांवर शस्त्रांनिशी हल्ला केला. त्यामध्ये भारतीय लष्कराचे 20 जवान शहीद झाले असून कर्नल संतोष बाबू यांचाही समावेश आहे. कर्नल संतोष बाबू चर्चा करून चीनच्या सैनिकांना मागे जाण्यास सांगत असतानाच चीनच्या सैनिकांनी लाठ्या – काठ्या, दगडे आणि फेन्सिंग तारा गुंडाळलेल्या रॉडने त्यांच्यावर हल्ला केला होता.