कर्नाटक पोटनिवडणूक निकाल : काँग्रेसला मोठा धक्का, येडियुरप्पा सरकार तरलं

बेंगळुरू : वृत्तसंस्था – कर्नाटक विधानसभेच्या 15 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणीत भाजपने 15 पैकी 12 जागांवर आघाडी घेतली आहे तर काँग्रेस 2 आणि अपक्ष एका जागी आघाडीवर आहे. . पुन्हा सत्ता राखण्यासाठी येडीयुरप्पा सरकारला बहुमतासाठी केवळ सातच जागा आवश्यक आहेत. काँग्रेसने पराभव मान्य केला आहे. राज्यातील 15 जागेच्या पोटनिवडणुकीसाठी 5 डिसेंबर रोजी मतदान पार पडले होते.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला जास्त जागा मिळाल्या होत्या मात्र बहुमताला काही जागा कमी पडत होत्या. त्यामुळे काँग्रेसने जेडीसला समर्थन दिलं आणि कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले. मात्र हे सरकार फार काळ टिकलं नाही.

काँग्रेस-जेडीएसच्या 17 बंडखोर आमदारांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आल्यामुळे कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले होते. यामुळे येडियुरप्पा सरकार बहुमतात आले आणि त्यांनी सरकार स्थापन केले. दरम्यान, हायकोर्टाने 2 जागांवरील निवडणूक स्थगित करीत इतर 15 जागांवर निवडणुकीला परवानगी दिली होती. त्यानुसार, या जागांवर नुकतीच पोटनिवडणूक पार पडली होती.

कर्नाटक विधानसभेत एकूण जागा 225 आहेत. मात्र त्यातल्या 17 सदस्यांना अपात्र ठरवल्यामुळे सख्या 208वरच आली होती. कर्नाटक विधानसभेत भाजपला 105, जेडीएसला 34 तर काँग्रेसला 66 जागा आहेत. बहुमत मिळवून स्थिर सरकार चालविण्यासाठी येडुरप्पांना या 7 जागा जिंकणं महत्त्वाचं आहे.

Visit : Policenama.com