कर्नाटकातील ११ आमदारांच्या राजीनाम्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असल्याची चर्चा, आज मुंबईत हालचाली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या कर्नाटकच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कर्नाटकातील सत्तापालट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएसची सत्ता पालटण्यासाठी भाजप पूर्णपणे ताकद लावत आहे. काल काँग्रेस आणि जेडीएसच्या १२ आमदारांनी राजीनामे दिले, त्याने काँग्रेस आणि जेडीएसला जोराचा धक्का बसला.

त्यानंतर आता भाजप राजीनामा दिलेल्या आमदारानी पुन्हा त्यांच्या पक्षात जाऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे. भाजपने या राजीनामा दिलेल्या आमदारांना मुंबईत आणण्यात आले आहे. हे सर्व आमदार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे म्हटलं जात आहे. कारण भाजपने या आमदारांची मने वळवण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवल्याची माहिती आहे. त्यामुळे कार्नाटकमध्ये सत्ता पालट झाली तर यात देवेंद्र फडणवीसांचा हात असेल याला म्हणायला हरकत नाही.

कार्नाटकातील सत्ता पालट करण्यासाठी भाजपने वापरलेल्या हातकंड्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार टिकणार की जाणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभेत काँग्रेसचा दारून पराभव झाल्यानंतर काँग्रेसमध्ये संभ्रमतेचे वातावरण आहे. त्यामुळे कर्नाटकातील काँग्रेसच्या ११ आणि जेडीएसच्या ३ आमदारांचा समावेश आहे.

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणूकांमध्ये भाजपला सत्ता स्थापन करण्यात अपयश आले. त्यामुळे हा पराभव भाजपच्या अधिकच जिव्हारी लागला आहे. कर्नाटकमधील २२४ जागांपैकी काँग्रेसकडे ७८, जेडीएस ३७, बसपा १, अपक्ष २, भाजप १०५ आणि अन्य १ अशी आकडेवारी आहे. बहुमतासाठी ११३ जागांची आवशकता आहे. मात्र ११ आमदारंनी राजीनामे दिल्यावर बहुमताचा आकडा हा १०६ होईल. हे गणित पाहता काँग्रेस-जेडीएसकडे १०४ जागा आहेत, तर भाजपकडे १०५ त्यामुळे भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी फक्त एका आमदाराची गरज आहे. कर्नाटकात भाजपला सत्ता स्थापन करण्याची संधी आहे. त्यामुळे कर्नाटकात काय होणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

असे ठेवा ‘मेंदू’वर नियंत्रण, जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय