Not OUT 100 : वृद्ध दाम्पत्यांनी एकत्र दिला कोरोनाशी लढा, घरीच उपचार घेऊन अवघ्या 12 दिवसात केली मात

कर्नाटक : वृत्तसंस्था – कोरोनाच्या Corona संकटकाळात कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्याच्या तंबरागुड्डी गावात राहणा-या एका शंभरी पार केलेल्या दाम्पत्याने सकारात्मक उर्जा देण्याचे काम केले आहे. शंभरी पार केलेल्या आजी-आजोबांनी घरीच उपचार घेऊन अवघ्या 12 दिवसात कोरोनावर Corona मात केली आहे. कोरोनाविरोधातील लढा यशस्वी केल्याने या दाम्पत्याच्या कुटुंबानेच नव्हे तर शेजाऱ्यांनीही आनंद साजरा केला आहे. जर इतके वयस्कर लोक बरे होऊ शकतात तर तरुणांनी घाबरण्याची काय गरज आहे, प्रत्येकासाठी हे दाम्पत्य एक प्रेरणा आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणी ‘या’ कारणामुळं वाढणार ?

बेल्लारी जिल्ह्याच्या तंबरागुड्डी गावात राहणारे 103 वर्षांचे एरेन्ना आणि 101 वर्षांच्या एरेम्मा या आजी-आजोबांचा 15 दिवसापूर्वी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यात कोणतेही लक्षण नसल्याने त्यांनी घरीच स्वतःला आयसोलेट करून उपचार सुरु केले. अवघ्या 12 दिवसांतच या दाम्पत्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. या दीर्घायुष्याचे रहस्य काय याबाबत अनेक जण या दाम्पत्याला विचारतात. चांगल आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक विचारच महत्त्वाचे आहेत. आम्ही साध अन्न खातो आणि एकमेकांसोबत जास्त वेळ घालवतो. माझ्या तरुणपणात मी खूप कष्ट केले आहेत. जर तुम्ही हृदयापासून आनंदी असाल तर तुम्हाला कशामुळेच नुकसान पोहोचणार नसल्याचे एरप्पा यांनी म्हटले आहे. तर एरम्मा म्हणाल्या की, आम्ही हेल्दी कस राहतो या प्रश्नांची उत्तर आमच्याकडे नाहीत. पण आमच्याकडे जे आहे, त्यात आम्ही समाधानी आहोत. देवाच्या कृपेने इतकी वर्षे आम्ही एकत्र आहोत. त्यांचे शेजारी जयम्मा यांनी सांगितले की, या दोघांनीही आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांना जे कोरोना नियम सांगितला, त्याचे तंतोतंत पालन केले. त्यामुळेच ते बरे झाले. या दाम्पत्याला 7 मुलं आहेत. आपली मुल, नातवंडं आणि पतवंडांसोबत ते राहतात.

 

दिलासादायक बातमी ! कोरोनाच्या केस होताहेत कमी, 12 आठवड्यानंतर मृत्यूंचे आकडेसुद्धा घसरले

‘या’ वयात सर्वात जास्त मिळतो शरीरसुखाचा आनंद, जाणून घ्या कालावधी

‘प्रेमा’ला विरोध झाल्याने चुलत बहिण-भावाने केली ‘आत्महत्या’

Pune : भरधाव दुचाकीनं रस्ता क्रॉस करणार्‍या 7 वर्षाच्या सियाला उडवलं; चिमुरडी गंभीर जखमी

रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा, म्हणाले – ‘राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून पैसे मिळत नाहीत’

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना 10 टक्के EWS आरक्षणाचा लाभ मिळणार