कर्नाटक : भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू तर २० हून अधिक जखमी

वृत्‍तसंस्था : कर्नाटकातील चिंतामणी येथे झालेल्या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे तर 20 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात अ‍ॅटो रिक्षा आणि बसमध्ये झाला असून रिक्षामधील जवळपास सर्वच जण मृत्यूमुखी पडले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्यांना तात्काळ जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बस आणि अ‍ॅटो रिक्षा हे दोन्ही वाहनांचा वेग प्रचंड असल्याने अ‍ॅटो रिक्षाचा चुराडा झाला आहे. जखमी झालेल्या 20 पैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थही वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी धाव घेतली आहे. मदत कार्य युध्दपातळीवर सुरू आहे. दरम्यान, जखमी झालेल्या सर्वांना तात्काळ जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले असुन त्यांच्यावर उपचार चालु आहेत. त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात 12 जण ठार झाले असून मयतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे

बाळासाहेब आंबेडकर यांची मुंबईत आज पत्रकार परिषद ,विधानसभेबाबत करणार मोठा खुलासा

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती