कर्नाटकमध्ये बस कालव्यात कोसळली, २५ जणांचा मृत्यू 

बंगळुरू : वृत्तसंस्था-कर्नाटकातील मांड्या येथे एका खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. ही बस कालव्यात कोसळून या दुर्घटनेत २५ पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्य झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश आहे.

दरम्यान ,स्थानिक प्रशासनाने बचावकार्य हाती घेतले आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मांड्या जिल्ह्यातील कावेरी नदीला जोडणाऱ्या कालव्यात शनिवारी (२४ नोव्हेंबर) एक खासगी बस कोसळली. या भीषण अपघातात २५ हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये मुले आणि महिलांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान हा भिषण अपघात कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.