धक्कादायक ! नोकरी गेल्यामुळे एकाच कुटुंबातील 3 जणांची आत्महत्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : लॉकडाऊनमुळे अनेक छोटे उद्योगधंदे बंद पडले आहेत. तर काही कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचार्‍यांमध्ये कपात करण्यात आली. याच दरम्यान नोकरी गेल्याच्या विवंचनेतून दाम्पत्याने आपल्या मुलीसह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कोरोनामुळे नोकरी गेली तर जगायचे कसे या भीतीपोटी एकाच कुटुंबातील तीन जणांनी आयुष्य संपवले आहे. कर्नाटकातील धारवड इथे तरुणासह पत्नी आणि मुलगी अशा तिघांनी आयुष्य संपवले आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी घटनास्थळावर पोलिसांना एका सुसाईड नोट मिळाली आहे. दरम्यान तीनही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. संबंधित दाम्पत्य लॉकडाऊन आणि कोरोनामुळे नोकरी गमावण्याच्या भीतीमुळे अस्वस्थ होते. त्यांनी हे धक्कादायक पाऊल उचलले असल्याचे सांगितले आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात अनेक कामं बंद असल्यानं मजुरांची परवड झाली. आर्थिक चणचण आणि मोठा फटका सगळ्याच क्षेत्रांना बसल्यामुळे कर्मचारी कपात झाली. त्यामुळे अनेकांनी रोजगार गमावले आहेत. आर्थिक संकटांचा सामना करताना दाम्पत्याने मुलीला संपवून आत्महत्या केली.