जिलेटीन कांड्यांच्या स्फोटात 6 जण ठार

बंगलुरु : कर्नाटकातील चिक्काबल्लापूर गावातील हिरेनागवल्ली येथे जिलेटीन कांड्यांचा स्फोट होऊन त्यात ६ जणांचा जागीच मृत्यु झाला तर एक जण जखमी झाला आहे. उत्खननासाठी मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा वापर केल्याने ही दुर्घटना झाल्याचे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले. बोम्माई यांनी घटनास्थळाला भेट देऊन चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.

शिवमोगा येथे काही दिवसांपूर्वी असाच स्फोट होऊन त्यात अनेकांचा मृत्यु झाला होता. त्यानंतर कर्नाटकात पुन्हा अशीच दुर्घटना घडली आहे.

या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कर्नाटकातील चिकबल्लापूर येथे झालेल्या दुर्घटनेत जीवितहानी झाली आहे. शोकाकुल कुटुंबांना माझी सहानुभूती आहे. जखमींचे लवकर आरोग्य सुधारो, अशी प्रार्थना.

मुख्यमंत्री बी़ एस़ युडियुरप्पा यांच्या मतदारसंघातील शिवगोमा येथे काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे जिलेटीन कांड्यांचा स्फोट होऊन काही जणांचा मृत्यु झाला होता. त्यानंतरही जिलेटीन कांड्या बाळगण्याबाबत काहीही काळजी न घेतल्याने ही दुसरी दुर्घटना घडली आहे.