Coronavirus Lockdown : ‘या’ राज्यात 4 मे पासून सुरू होणार IT कंपन्या, सरकारनं दिली परवानगी

बेंगुळुरु : वृत्तसंस्था – दक्षिण कर्नाटक राज्यात ४ मेपासून बिजनेस ऍक्टिव्हिटी पुन्हा सुरू होऊ शकतात. कर्नाटक राज्य सरकारने यासाठी तयारी सुरू केली असून एका वृत्तानुसार गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती मिळाली आहे. कोरोना बाधित क्षेत्र वगळता इतर ग्रीन झोनमध्ये याला मंजुरी दिली आहे. परंतु कंपन्या केवळ ५० टक्के कर्मचार्‍यांनाच कामावर बोलावू शकतात.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी गुरुवारी उद्योग सदस्यांसह एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. त्यात चर्चा केल्यानंतर उद्योगामधील सदस्यांनी सुरक्षितता राखत ऑपरेशन सुरू करण्यास सहमती दर्शवली. कर्नाटकमध्ये बेंगळुरू आणि म्हैसूर ही शहरे सर्वात जास्त कोरोना प्रभावित भागात आहेत. येथे बरीच प्रकरणे नोंदवण्यात आली असल्यामुळे त्यांना रेड झोनमध्ये टाकले आहे.

सोमवारपासून खुलणार ऑफिस-
सोमवार म्हणजे ४ मेपासून सगळे उद्योग, ज्यात मोठे उद्योग, SME, सरकारी कंपन्या आणि आयटी कंपन्यांचा समावेश आहेत. हे सगळे ऑपरेशनला पुन्हा सुरू करू शकतात. मात्र केंद्र सरकारने आयटी उद्योगाला या आठवड्यात ३१ जुलैपर्यंत घरून काम करण्याचा पर्याय दिला आहे. राज्यात ४ मे नंतरही मॉल्स आणि हॉटेल्स बंद राहतील, पण राज्यात टेकअवे जेवणाची परवानगी असेल.

आपल्या खासगी वाहनाने जावे लागेल ऑफिसला-
सार्वजनिक वाहतूक पुन्हा सुरू होण्यासंदर्भात राज्य सरकारला अद्याप काही माहिती नाही, त्यामुळे कंपन्या व कर्मचार्‍यांना कामासाठी खासगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागेल.

तसेच राज्य सरकारने दारूची दुकाने सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. याबाबत ३ मे रोजी निर्णय घेतला जाईल. मात्र लॉकडाऊनच्या काळात दारूची विक्री ठप्प झाल्याने उत्पादन शुल्क विभाग राज्यातील घटत्या महसुलाचे कारण सांगत आहे.