बीफ विकत असल्याच्या संशयावरून हॉटेल दिले पेटवून

बंगळुरू : कर्नाटक वृत्तसंस्था – देशात गोरक्षकांच्या हैदोस वाढू लागला आहे. बीफ असल्याच्या संशयावरून देश भर हत्या केल्या जात असतानाच आता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बीफचे जेवण करून विकण्याच्या प्रकरणात एका महिलेचे हॉटेल पेटवून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. कर्नाटकमधील सकलेशपूरमध्ये रस्त्याकडेला दोन महिलाचे छोटे हॉटेल आहे. त्या हॉटेलवर हल्ला चढवून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ते हॉटेल पेटवून दिले आहे.

७० वर्षाच्या खामरूनिस्सा आणि त्यांची सून दोघी झोपडपट्टीच्या कडेला छोटेशे हॉटेल चालवतात. या हॉटेल मध्ये रत्यावर येणारे जाणारे आस्वाद घेतात. या हॉटेल मध्ये दुपारच्या सुमारास बजरंग दलाचे कार्यकर्ते घुसले. त्यांनी हॉटेलच्या महिला मालकाला तुम्ही तुमच्या हॉटेल मध्ये बीफ का विकता असे विचारले. गोंधळ घालत त्या सर्वांनी हॉटेल पेटवून देण्याचा प्रकार केला आहे.

या प्रकारात हॉटेल चालक महिलांनी दिलेल्या पोलीस फिर्यादीवरून बजरंग दलाच्या पाच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांमध्ये एक कार्यकर्ता अल्पवयीन असल्याचे हि पोलिसांनी सांगितले आहे. बजरंग दलाच्या तक्रारी वरून पोलीसांनी हॉटेलची चौकशी केली असता त्या हॉटेल मध्ये त्यांना बीफ आढळले नाही असे तपास अधिकाऱ्यांनी म्हणले आहे.