लॉकडाऊन दरम्यान ‘या’ बँकेत समोर आला 285 कोटींच्या फसवणुकीचा घोटाळा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – खासगी क्षेत्रातील कर्नाटक बँकेने आपल्या चार कर्ज खात्यात २८५ कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या फसवणूकीची माहिती रिजर्व बँकेला दिली आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या डीएचएफएलसह चार युनिट्सची खाती नॉन-परफॉर्मिंग एसेट (एनपीए) झाली आहेत. कर्नाटक बँकेने शुक्रवारी शेअर बाजारांना पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, एकूण २८५.५२ कोटी रुपयांच्या कर्जाची फसवणूक उघडकीस आली आहे. २००९ ते २०१४ या कालावधीत बँकांच्या गठबंधनातून दिवाण हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन (डीएचएफएल), रेलिगेयर फिनव्हेस्ट, फेडर्स इलेक्ट्रिक अँड इंजिनिअरिंग लि. आणि लिल इलेक्ट्रिकल्सला कर्ज दिले होते. यात कर्नाटक बँकही सामील होती.

DHFL वर सर्वात जास्त थकबाकी
नोटीसमध्ये म्हटले आहे की, सर्वात जास्त १८०.१३ कोटींचे कर्ज डीएचएफएलवर थकीत आहे. रेलिगेयर फिनवेस्टवर ४३.४४ कोटी रुपये, फेडर्स इलेक्ट्रिकवर ४१.३० कोटी आणि लिल इलेक्ट्रिकल्सवर २०.५५ कोटी रुपये थकबाकी आहे.

२०१४ मध्ये DHFL सह संबंधित होती कर्नाटक बँक
बँकेने म्हटले की, डीएचएफएल २०१४ पासून त्यांच्याशी संबंधित आहे आणि त्यांनी बँकांच्या गठव्यवस्थेअंतर्गत त्यांच्याकडून अनेक कर्जाच्या सुविधा घेतल्या आहेत. आम्ही गठव्यवस्थेत सदस्य बँक आहोत. बँकेने म्हटले की, कंपनीचे खाते ३० ऑक्टोबर २०१९ रोजी एनपीए घोषित केले गेले. आता कंपनीकडून बँकेतून एकूण १८०.१३ कोटींच्या फसवणूकीची माहिती रिजर्व बँकेला दिली गेली आहे.

त्याचप्रमाणे रेलिगेयर फिनवेस्टही २०१४ पासून बँकेशी संबंधित आहे आणि त्यांनीही कर्जाच्या अनेक सुविधा घेतल्या आहेत. गठसदस्यांद्वारे कंपनीचे खाते ऑक्टोबर २०१९ मध्ये एनपीए घोषित केल्यानंतर बँकेने रिझर्व्ह बँकेला कर्ज फसवणूकीची सूचना दिली आहे. कंपनीवर ४३.४४ कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. मार्च २०१९ मध्ये लिल इलेक्ट्रिकल्सचे खाते एनपीए घोषित केले. तसेच फेडर्स इलेक्ट्रिक अँड इंजिनिअरिंग लि.चे खाते सदस्य बँकेद्वारे जुलै २०१८ मध्ये एनपीएच्या श्रेणीत टाकले गेले.