Vijay Hazare Trophy 2021 : कर्नाटकच्या रविकुमार समर्थची तुफान फटकेबाजी, 25 चेंडूत काढल्या 106 धावा, केवळ 8 धावांनी हुकल द्विशतक

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   कर्नाटकचा कर्णधार रविकुमार समर्थ याने सोमवारी (दि. 8) विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत केरळच्या संघाची चांगलीच धुलाई केली. स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात त्याने 158 चेंडूमध्ये नाबाद 192 धावा काढल्या. त्याने 25 चेंडूत तब्बल 22 चौकार आणि 3 षटकार ठोकत अक्षरक्षः धावांचा पाऊस पाडला. एसबीआय बॅंकेत काम करणा-या समर्थच्या वडिलांना मुलाच्या या दमदार खेळीचा अभिमान वाटत आहे.

रविकुमार समर्थने प्रथम फलंदाजी करताना देवदत्त पडिक्कलसह पहिल्या विकेटसाठी 249 धावांची भागिदारी केली आणि संघाने 50 षटकांत 3 बाद 338 धावांचा डोंगर उभा केला. समर्थने केरळच्या गोलंदाजांची धुलाई करत 122 च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली. त्याच्या 192 धावांच्या खेळीत 106 धावा चौकार अन् षटकाराने काढल्या आहेत. त्याने तब्बल 22 चौकार व 3 षटकार खेचून 25 चेंडूत 106 धाव काढल्या आहेत. विजय हजारे ट्रॉफी 2021च्या मौसमात 600 पेक्षा जास्त धावा करणारा रविकुमार समर्थ हा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याने 6 डावांत 605 धावा केल्या असून त्यात 3 शतक आणि 2 अर्धशतकाचा समावेश आहे. यंदाच्या विजय हजारे ट्रॉफी पर्वात सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करणाऱ्या फलंदाजांत समर्थ हा तिस-या स्थानी आहे. मुंबईचा पृथ्वी शॉ नाबाद 227 आणि वेंकटेश अय्यर 198 धावांसह अनुक्रमे पहिल्या व तिसऱ्या क्रमांकावर आहे. समर्थने 66 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांत 4171 धावा केल्या आहेत. त्यात 10 शतक आणि 21 अर्धशतकाचा समावेश आहे. 37 लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 1581 धावा केल्या आहेत.