धक्कादायक ! धावत्या बसने घेतला पेट, चिमूरड्यासह 4 जणांचा होरपळून मृत्यू तर 27 जखमी

पोलिसनामा ऑनलाईन – कर्नाटकातील चित्रदुर्गा येथे एका खासगी बसल अचानक आग लागली. ही आग एवढी भयंकर होती की यात एका बाळासह 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 27 जण जखमी झाले आहे. ही बस बंगळूरहून विजयापुराकडे जात होती. त्यावेळी असताना अचानक चित्रदुर्ग महामार्गावर बसला आग लागली. आगीच्या वेळी बसमध्ये 32 प्रवासी होते.

अपघातात मृत्यू झालेल्यामध्ये दोन मुले आणि एक महिलेचाही समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, इंजिनला आग लागण्याचे कारण सांगितले जात आहे. हिरियूरच्या एसपी राधिका यांनी अपघाताची माहिती घेतली. जखमी झालेल्या 27 जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांनी एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.