अबब ! ‘त्या’ आमदाराच्या संपत्तीत फक्त दीड वर्षात तब्बल 185 कोटींची वाढ

बंगळुरु : वृत्तसंस्था – काँग्रेस आणि जेडीएस मधील 17 आमदारांनी बंडखोरीकरत कुमारस्वामी सरकार पडले होते. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी बंडखोरी करणाऱ्या आमदारांना अपात्र ठरवले होते. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने अपात्र आमदारांपैकी 15 आमदारांना निवडणुक लढवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये 15 जागांवर पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीवर संपूर्ण कर्नाटकसह देशाचे लक्ष लागून राहिले आहे. कारण या पोटनिवडणुकीवर राज्यातील भाजपचे सरकार राहणार की नाही हे ठरणार आहे.

या 15 आमदारांपैकी एक आमदार सध्या देशभरात चर्चेत आले आहेत. होस्केट मतदारसंघातून भाजपचे उमेदवार एम.टी. बी. नागराज यांनी निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे. अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी 1 हजार 223 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा उल्लेख केला आहे. याआधी काँग्रेस-जेडीएस सरकारमध्ये नागराज हे सहकार मंत्री होते. त्यावेळी त्यांची संपत्ती 1 हजार 063 कोटी रुपयांची होती. मात्र मागील 18 महिन्यात त्यांच्या संपत्तीत 185 कोटींची वाढ झाली असून आता ती 1 हजार 223 कोटी इतकी झाली आहे.

भाजपचे प्रवक्ते मधू सुदना यांनी सांगितले की, नागराज हे देशातील श्रीमंत राजकीय नेत्यापैकी एक आहेत. नागराज हे प्रत्येक निवडणुकीमध्ये स्वत:ची आणि आपल्या पत्नीची संपत्ती जाहीर करीत असतात. 66 वर्षीय नागराज बेंगळुरु ग्रामीणमधील विधानसभा मतदारसंघातून 3 वेळा आमदार झाले आहेत. कुमारस्वामी सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहनिर्माण खाते होते. कुमारस्वामी सरकारविरोधात बंडखोरी केल्याबद्दल विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी नागराज यांना अपात्र ठरवले होते.

Visit : Policenama.com