धक्कादायक ! ‘या’ कारणामुळे संपूर्ण कुटुंबाने संपविले आयुष्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटकमधील चामराजनगर येथे एका व्यक्तीने आपल्या कुटुंबातील चार व्यक्तींना गोळी मारून स्वतःदेखील आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार या कुटुंबाचा एक व्यवसाय होता आणि या व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट उपलब्ध झाली नसून मृतदेहांना ताब्यात घेण्यात आले असून तपास सुरु करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या परिवारातील प्रमुख सदस्याने सुरुवातीला कुटुंबातील सदस्यांना गोळी मारून स्वतः देखील गोळी झाडून आत्महत्या केली.

घटनास्थळावर पोलिसांना ३३ वर्षीय ओंकार प्रसाद यांच्या मृतदेहाजवळ एक बंदूक आढळून आली आहे. त्यांनी सुरुवातीला ६० वर्षीय नागराज भट्टाचार्य यांना मारले त्यानंतर आपल्या आईला देखील ठार केले. मृत ओंकार प्रसाद यांच्या आईचे नाव हेमलता असून पत्नीचे नाव निकिता तर मुलाचे नाव आर्यकृष्ण होते. मागील काही दिवसांपासून हे कुटुंब बांदीपुरच्या जंगलाजवळ असलेल्या आपल्या फार्म हाऊसमध्ये थांबले होते.

तर आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या ड्रायव्हरला त्या ठिकाणाहून जाण्यास सांगितले होते. देशभरात अशा प्रकारे अनेक कुटुंबांनी सामूहिक आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामागे अनेक करणे आहेत.
दरम्यान, पोलिसांनी त्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून यामागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like