तर मी मुख्यमंत्री पदाचा राजीमाना देईल

बेंगळुरू : कर्नाटक वृत्तसंस्था – जेडीएस आणि काँग्रेस या दोन पक्षांनी आघाडी करून भाजपला सत्ते पासून रोखण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. मात्र दोन्ही पक्षांत काही काळापासून काही आलबेल नाही असे दिसू लागले आहे. कारण काँग्रेसच्या आमदाराने माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केल्याने मुख्यमंत्री कुमार स्वामी यांना चांगलाच राग आला आहे. त्या रागापोटी त्यांनी आपण मुख्यमंत्री पदाचा राजीमाना देऊ असे म्हणले आहे.

भारतीय जनता पक्ष कर्नाटकाच्या विधानसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला होता. मात्र जेडीएस आणि काँग्रेस यांनी एकत्रित येत भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. आता हा निर्णय काँग्रेसला आणि जेडीएसला रोजची डोकेदुखी वाटू लागला आहे. भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ राबवून काँग्रेस आणि जेडीएसची पळता भुई थोडी केली होती. मात्र त्यात भाजपला यश आले नाही म्हणून म्हणून कुमार स्वामींचे सरकार तरले आहे. अशातच काँग्रेसचे आमदार एस. टी. सोमशेखर यांनी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केल्याने कुमार स्वामी यांच्या रागाचा पारा चढला आहे.

मुख्यमंत्री कुमार स्वामी आणि काँग्रेसचे आमदार यांच्यात सततच कुरघोडी सुरु असतात. मंत्री मंडळात सहभाग मिळाला नाही म्हणून काँग्रेसचे मंत्री कुमार स्वामी यांच्यावर नाराज आहेत. त्यांच्या नाराजी मुळे कुमार स्वामी आणि काँग्रेस आमदारांमध्ये सतत सुक्ष वाद होत राहतात. मागच्या काही महिन्यात कुमार स्वामी पत्रकार परिषदेत मोठ्याने रडू लागले आणि म्हणले मी सध्या आघाडीचे विष पचवतो आहे. अशा कुरघोडी नेहमीच जेडीएस आणि काँग्रेस मध्ये सुरु राहतात.

काँग्रेस पक्षाने कुमार स्वामी यांचा अवमान केल्या बद्दल आमदार एस. टी. सोमशेखर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी हि या आमदाराची कान उघडणी केली आहे.

Rafale Deal : ‘राणेंची ती ऑडिओ क्लिप खरी’
राष्ट्रवादीला धक्का : ‘या’ माजी मंत्र्याचा भाजपात प्रवेश