…. तर मी राजीनामा देऊन घरी बसायला तयार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांनी म्हंटले आहे की, त्यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी 17 आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या त्यागामुळे आणि पंचमसाली मठाच्या आशीर्वादामुळे ते मुख्यमंत्री झाले होते. तीन वर्षांपर्यंत सरकार कसे चालवायचे याबाबत तुम्ही आम्हाला सूचना देऊ शकता असे येडीयुरप्पा यांनी सांगितले. परंतु माझ्या मागण्या मान्य नसतील होणार तर मी मुख्यमंत्री पद सोडून घरी बसायला तयार आहे. असे येडीयुरप्पा म्हणाले.

मिळालेल्या माहितीनुसार, 15 जानेवारीनंतर येडीयुरप्पा आपल्या सरकारचा विस्तार करू शकतात. यानुसार किमान डझनभर मंत्र्यांचा समावेश केला जाणार आहे. त्याव्यरिक्त बेळगावातून देखील नेतृत्व वाढवण्याची चर्चा सुरु आहे. मात्र याला नकार देत येडियुरप्पा म्हणाले की, पंचमसाली लिंगायत समुदायातील कोणालाही मंत्री बनवण्यावर अजून कोणताच निर्णय झालेला नाही.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी खरमास मुळे आपल्या मंत्री मंडळाचा विस्तार थांबवल्याचे समजते. ज्योतिषाला विचारल्याशिवाय येडीयुरप्पा कोणतेही काम करत नसल्याचे सांगण्यात येत आहे. कर्नाटकात काही जागांवर पुन्हा निवडणूक घेण्यात आली होती त्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसचे जवळ जवळ सर्वच उमेदवार विजयी झाले होते आणि आता मंत्री पदासाठी देखील त्यांच्यात शर्यत सुरु आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/