पोलिसांनी श्रमदानातून केले बंधाऱ्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – बीड पोलीस दलाना कोल्हापूर पद्धीतीच्या बंधाऱ्यातील गाळ काढून बंधाऱ्याची खोलीकरण, रुंदीकरण आणि लांबीकरण करून तीन हजार लोकांच्या पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. या बंधाऱ्याचा लोकार्पण सोहणा नुकताच विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. रविंद्रकुमार सिंघल यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे, जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात आणि सामाजिक कार्यकर्ते गौतम खटोड उपस्थित होते. अशा प्रकारचे काम करणारे बीड जिल्हा पोलीस दल हे राज्यातील पहिले पोलीस दल ठरले असून ती एक जलक्रांती ठरणार आहे.

बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना या गावची लोकसंख्या तीन हजार आहे. या गावात उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता भासते. गावाजवळ १९९० साली कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला आहे. मात्र, या बंधाऱ्यात गाळ साचल्याने बंधाऱ्याची पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली होती. पोलिसांनी सामाजीक बांधलकीच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून या बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा मानस केला. यासाठी प्रभारी पोलीस अधीकारी शरद भुतेकर यांनी ग्रमस्थांना विश्वासात घेऊन या कामासाठी त्यांची देखील मदत घेण्यात आली.

पोलीस दल आणि ग्रामस्थांनी या बंधाऱ्यातील गाळ काढून बंधाऱ्याचे २५ फूट खोलीकरण, १९० फुट रुंदीकरण आणि ५५० फुट लांबीकरण करण्यात आले. या कामासाठी पोलीस आणि गावकऱ्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. बंधाऱ्याच्या कामासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि गावातील सरपंच, पोलीस पाटील यांच्यासह गावकऱ्यांनी श्रमदान केले. पोलिसांनी आणि गावकऱ्यांनी केलेल्या कामामुळे ताडसोन्ना गावाचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

कार्य़क्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी केले. सुत्रसंचालन प्रशांत जोशी यांनी केले. तर आभार पोलीस उपविभागीय अधिकारी भास्कर सावंत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न केले.

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ७ उपाय

‘तळहात’ पाहून सुद्धा ओळखू शकता, तुम्हाला आहे कोणता आजार ?

‘या’ गोष्टींचे सेवन करणाऱ्या महिलांना कधीही होत नाही ‘ब्रेस्ट कॅन्सर’

रोज सकाळी ‘मनुक्यांचे पाणी’ प्या आणि मिळवा ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

रक्ताचा अभाव, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर ‘पांढरा कांदा’ उपयोगी

सावधान ! ‘गहू’ आरोग्यासाठी नुकसानकारक