कर्नाटकनंतर सत्‍तेसाठी भाजपच्या रडावर ‘ही’ दोन राज्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएसवर सर्व बाजूंनी संकट येत आहेत. दोन्ही पक्षाच्या १३ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर हे सरकार वाचवण्याचा प्रयत्न पूर्णत: करत आहेत. मात्र आज काँग्रेस जेडीएसवर वीजच पडली आहे, असं म्हणायला हरकत नाही. कर्नाटकचे मंत्री आणि स्वतंत्र आमदार नागेश यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर कर्नाटकातील सर्व काँग्रेस मंत्र्यांनी या पदावरून राजीनामा दिला आहे. हा राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांची संख्या २२ आहे. हा काँग्रेसला मोठा धक्काच आहे. त्यामुळे आता काँग्रेस-जेडिएसची सत्ता पलटू शकते. पण कर्नाटकमध्ये लागलेले हे भाजपचे ग्रहण आता राजस्थान आणि मध्य प्रदेशमधीलही सत्तेलाही लागण्याची शक्यता आहे.

सध्या कर्नाटकमधील राजीनामा दिलेल्या आमदारांना भाजपकडे वळवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुका होण्यापूर्वी भाजपने कर्नाटकमधील सत्ता स्थापनेबाबत संयमी भूमिका घेतली होती. मात्र लोकसभेनंतर भाजपने सत्तेला हलवण्यास सुरुवात केली आहे. त्यात प्रचारावेळी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी दक्षिणेकडील तीन राज्यात म्हणजे केरळ, तेलंगाना आणि आंध्रप्रदेश मध्ये भाजपची सत्ता येईल. त्यात आता कर्नाटकचेही नाव जोडण्यात येत आहे.

दरम्यान, छत्तीसगडमध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता आली होती. मात्र राजस्थान, मध्य प्रदेश मध्ये काठावरची आकडेवारी घेत काँग्रेसने सत्ता स्थापन केली आहे. या दोन राज्यातील सत्तेलाही थोडी फुंकर घातली की त्यांची सत्ता पडेल. त्यामुळे कर्नाटकची सत्ता काबीज केल्यावर भाजपची नजर राजस्थान, मध्य प्रदेश असेल असं म्हणायला हरकत नाही.

आरोग्यविषयक वृत्त –

पावसाळ्यात ‘मेकअप’ करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

तुमच्या ‘आयब्रो’ चा रंग अधिक डार्क करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘त्वचा’ होईल तजेलदार आणि वाढेल ‘डोळ्यां’ची क्षमता, दररोज ‘हे’ करा

‘गुळ’ या आजारांवर ठेवतो नियंत्रण

द्रुतगती महामार्गावर भिषण अपघातात तीन ठार, एक गंभीर जखमी

माजी खासदार राजीव सातव यांचे मराठवाडा प्रदेश कार्यकारिणी च्या अध्यक्ष पदी नाव चर्चेत

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ