भाजपवर काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांचे अपहरण केल्याचा आरोप

बंगळुरु : वृत्तसंस्था – कर्नाटकमधील राजकीय सत्तेचा पेच अधिकाधिक चिघळत चालला आहे. काँग्रेस आणि जेडीएसच्या १३ आदारांसह काँग्रेसच्या २२ मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. राजीनामे दिलेले आमदार हे मुंबईत आहेत. ते बंगळुरुला पुन्हा येण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे काँग्रेससमोरील पेच वाढला आहे. राजीनामे दिलेल्या आमदारांना मंत्रीमंडळात घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. सध्या अजून एका आमदारानेही राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. मात्र मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आता कर्नाटकमधील सत्तेवर कोणाचेही कसलेही संकट नाही. अडचण दूर झालीय, संकट टळलं आहे, सर्व काही आलबेल आहे, असे त्यांनी सांगितलं. मात्र त्यांच्या चेहऱ्यावरील तणाव स्पष्ट दिसत होता.

राजीनामे दिलेले आमदार पुन्हा बंगळुरुकडे येण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे काँग्रेसचे दिग्गज नेते डी. के. शिवकुमार यांनी भाजपने आमदारांचं अपहरण केल्याता आरोप केला आहे. मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले अपक्ष आमदार नागेश यांना फोन केला होता. तेव्हा नागेश यांनी भाजपचे नेते येदियुरप्पा यांच्या पीएने आपलं अपहरण केल्याचे सांगितले. नागेश यांना खास विमानाने अज्ञात स्थळी नेण्यात आल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे. त्यामुळे कर्नाटकच्या राजकारणात नवीनच पेच समोर येत आहे.

दरम्यान, ज्या १३ आमदारांनी राजीनामे दिले आहेत, त्यांचे राजीनामे स्वीकारल्यावर कर्नाटकमध्ये सत्ता पालट होण्याची अधिक चिन्हे आहेत. २०१८मध्ये सुरुवातीला भाजपने सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला होता. पण अडीच दिवसात बहुमत सिद्ध न करता आल्यामुळे भाजपला सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. हा पराभव भाजपच्या नक्कीच जिव्हारी लागला असणार आहे. त्यामुळे भाजप आकड्याचे गणित साधून कर्नाटकमध्ये आपली सत्ता पुन्हा स्थापन करण्याचा प्रयत्न करणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

‘त्वचा’ होईल तजेलदार आणि वाढेल ‘डोळ्यां’ची क्षमता, दररोज ‘हे’ करा

पावसाळ्यात ‘मेकअप’ करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

तुमच्या ‘आयब्रो’ चा रंग अधिक डार्क करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘गुळ’ या आजारांवर ठेवतो नियंत्रण

द्रुतगती महामार्गावर भिषण अपघातात तीन ठार, एक गंभीर जखमी

माजी खासदार राजीव सातव यांचे मराठवाडा प्रदेश कार्यकारिणी च्या अध्यक्ष पदी नाव चर्चेत

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ