भाजपचा जाहीरनामा काँग्रेसवरूनच : राहुल गांधी

बंगळूर : वृत्तसंस्था
कर्नाटक विधानसभेची उत्सुकता आता अत्यन्त शिगेला पोहोचली आहे. जसे जसे निवडणुकीचा दिवस जवळ येतो तसतशा आरोप-प्रत्यारोपणाच्या फैरी जास्त तीव्र होत जातात. याच गोष्टीचा प्रत्यय आज पुन्हा एकदा राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यातून जाणवतो.

कर्नाटक विधानसभेत भाजप की काँग्रेस नक्की कोण बाजी मारेल हे तर येणारा काळच ठरवेल मात्र दोन्ही पक्षांनी कंबर चांगलीच कसलेली दिसते. आता कर्नाटक निवडणुकांसाठी भाजपने काँग्रेसचाच जाहीरनामा कॉपी केला आहे,असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. त्यांच्या जाहीरनाम्यातील अर्धी वचने हे आमच्या जाहीरनाम्यावरून उचलण्यात आली आहेत,” असे राहुल गांधी म्हणाले.

”काँग्रेसकडे विकासाची दृष्टीच नाही असा आरोप मोदी नेहमी करतात पण त्यांनी तरी कुठे विकास केला आहे? त्यांनी तर गांधी घराण्यावर शिंतोडे उडविण्याशिवाय काय केले आहे,”असा प्रश्न गांधी यांनी केला.
”देशात जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे ती चांगली नाही असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. माझ्या मंदिरांच्या भेटींवरून भाजपाचे नेते माझ्यावर टीका करतात त्यांना मी हे सांगू इच्छितो की मी आत्ताच नाही गेल्या १५ वर्षांपासून मंदिरांमध्ये जातोय, मशिदींमध्ये जातो आहे, गुरुद्वारांना भेटी देतो आहे. माझ्यासाठी सगळे धर्म सारखेच आहेत, मी कट्टर नाही. मी माणुसकी जपतो,”असे म्हणत राहुल गांधी यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर नरेंद्र मोदींवर टीका केली.

माझी आई भारतीय 
‘माझ्या आईचे मूळ इटलीत आहे. असे असले तरी तिने तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा काळ भारतात घालवलाय. मी पाहिलेल्या अनेक लोकांपेक्षा ती अधिक भारतीय आहे’, अशा शब्दात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल यांनी यांनी सोनिया गांधी यांचे मूळ इटलीत असण्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेवर पलटवार केला आहे.