Karnataka Elections 2023 | कर्नाटकात मुख्यमंत्रीपदासाठी 2500 कोटींचा लिलाव, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Karnataka Elections 2023 | राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटकात विधानसभेसाठी निवडणूक (Karnataka Elections 2023) होत आहे. निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Maharashtra Congress State President) नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर (BJP) मोठा आरोप केला आहे. कर्नाटकात मुख्यमंत्रीपदासाठी 2500 कोटी रुपयांचा लिलाव (Karnataka CM Auction) केला. याची माहिती माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (Former CM Jagdish Shettar) यांनीच दिल्याचे नाना पटोले यांनी सांगतले. कर्नाटकात 40 टक्के कमिशनचे सरकार आहे त्याचे उत्तर आधी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी द्यावे अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले म्हणाले, काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप (Corruption) करण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी आपल्या पक्षाच्या राज्य सरकारांचा (State Government) कारभार पहावा. काँग्रेसवर आरोप करुन तुम्ही तुमची सुटका करुन घेऊ शकत नाही. तुमच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे उत्तर जनतेला द्या. काँग्रेसवर बिनबुडाचे आरोप करुन दिशाभूल करु असे जर तुम्हाला वाटत असेल तर जनतेला तुमचा खरा समजलेला आहे हे लक्षात ठेवा. (Karnataka Elections 2023)

केंद्रात 9 वर्षे सत्तेत असताना भाजपने जनतेसाठी काहीच केलेले नाही. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहेत. देशाची संपत्ती विकून देश चालवणारा पंतप्रधान देशाने पहिल्यांदाच पाहिला आहे. मोदी यांचा खरा चेहरा देशातील जनतेला समजला असून मोदी हे ना हिंदूचे आहेत, ना मुस्लिमांचे, ना देशाचे, असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला.

जनतेने दोन वेळा बहूमत देऊन केंद्रात भाजपला सत्ता दिली.मात्र भाजपने जनतेला काय दिले,
याचे उत्तर देण्याची वेळ आली आहे. काँग्रेस 60 वर्षात काय केलं सांगण्यासाठी भाजपच्या प्रमाणपत्राची गरज नाही.
स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारच्या नेतृत्वात देशाने विकासाचे शिखर गाठले आहे.
काँग्रेसने विकास केला नसता तर नरेंद्र मोदी आज जी देशाची संपत्ती विकत आहेत ती कुठून आली असती,
असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला.

Advt.

Web Title :-   Karnataka Elections 2023 | congress state president nana patole targeted bjp and narendra modi

Join our WhatsApp Group, Telegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘भाकरी फिरवण्याची वेळ आली’ शरद पवारांच्या विधानाचा अर्थ काय? अजित पवारांनी सांगितलं…

Pune PMPML Bus News | कोथरूड स्टँड ते हिंजवडी माण फेज-3 आणि सांगवी गाव ते सिम्बायोसिस हॉस्पिटल लवळे या 2 नवीन मार्गावर पीएमपीची बससेवा, जाणून घ्या मार्ग

Ajit Pawar | राज ठाकरेंच्या सल्ल्याला अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले-‘जसे त्यांनी त्यांच्या काकांकडे…’