अरे बापरे ! मंत्र्यांचा दारूच्या ‘होम डिलेव्हरी’चा ‘प्लॅन’, ‘या’ मुख्यमंत्र्यांना समजलं अन् त्यांनी घेतला ‘समाचार’

बेंगळुरू : वृत्तसंस्था – कर्नाटकमधील भाजप सरकार एका एका मंत्र्यामुळे चांगलेच चर्चेत आले आहे. कर्नाटकचे अबकारी कर मंत्री (Excise Minister) एच नागेश यांनी एक प्रस्ताव सादर केला होता, ज्यानुसार सरकार लोकांना दारूची होम डिलीव्हरी सेवा देईल. ही बातमी समजताच मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना मंत्र्यांची खरडपट्टी काढली आणि त्यांना अशा योजना स्वतःकडेच ठेवायला सांगितल्या. याचा परिणाम म्हणून या संपूर्ण प्रकरणात मंत्र्यांना यू टर्न घ्यावा लागला.

सध्या कर्नाटकचा मोठा भाग पुरामुळे त्रस्त आहे. अशा परिस्थितीत अशा प्रस्तावामुळे सरकारची मोठी नाचक्की झाली असती हे पाहता मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मंत्र्यांना चांगलेच फैलावर घेतले.

येडियुरप्पा यांनी सकाळी एच नागेशला घरी बोलावून या विषयावर स्पष्टीकरण मागितले. सूत्रांच्या माहितीनुसार, सीएम येडियुरप्पा यांना मंत्र्यांच्या या प्रस्तावावर खूप राग आला होता. त्यांनी एच नागेशला सांगितले की, ‘तुम्हाला अशा कल्पनांबद्दल कोणी सांगितले आणि तुम्ही अशा विषयावर डायरेक्ट प्रेसशी कशी चर्चा केली. या प्रकारची कल्पना आपल्याकडे ठेवा. कर्नाटकात सध्या पूरस्थिती आहे. असा प्रस्ताव नव्या वादाला जन्म देऊ शकेल.’

असा घेतला यु टर्न :
त्यांनी नागेशला आणखी एक प्रेस मेळावा आयोजित करण्याचे निर्देश दिले आणि कर्नाटक सरकारकडे अशी कोणतीही योजना नसल्याचे स्पष्ट करावे.येडियुरप्पा यांच्या सूचना मिळाल्यानंतर एच नागेश यांनी पत्रकारांना सांगितले की, माझे विधान चुकीच्या पद्धतीने घेण्यात आले. मी फक्त उदाहरणे देत होतो की दारूची होम डिलीव्हरी सिस्टम बर्‍याच राज्यात आहे. आमच्याकडे अशी कोणतीही योजना नाही. माझ्या वक्तव्यामुळे त्रास झालेल्या महिलांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आमचे उद्दीष्ट म्हणजे अवैध दारूपासून राज्याला मुक्त करणे. आमच्या विभागाने कोणत्याही होम डिलिव्हरीचे आदेश दिले नाहीत.

मंत्र्यांचे पूर्वीचे वक्तव्य :
कर्नाटक सरकारचे मंत्री नागेश यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, जर लोकांना घरात दारू पुरवली गेली तर ड्रंक अँड ड्रायव्हिंगच्या घटना कमी होतील. ते म्हणाले की, दारू पिणाऱ्या अशा लोकांना कार्ड दिले जाईल. यानंतर त्यांच्या मागणीनुसार त्यांच्या घरी दारू पोचवावी.

नागेश हे अपक्ष आमदार आहेत :
एच नागेश कर्नाटकच्या मुलाबागिलूचे अपक्ष आमदार आहेत. कुमारस्वामी सरकारच्या बंडखोरीनंतर मुंबईला गेलेल्या १७ आमदारांपैकी ते आहेत. नवीन सरकार स्थापल्यानंतर येडियुरप्पा यांनी त्यांना मंत्री केले.

आरोग्यविषयक वृत्त –