महापूरापासून ‘जीव’ वाचवण्यासाठी ‘मगर’ जाऊन बसली घराच्या ‘छपरा’वर, (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रानंतर आता कर्नाटकमध्ये आलेल्या महापूरामुळे माणसासह जनावरांवर देखील परिणाम झाला आहे. कर्नाटकच्या बेळगावमध्ये एक वेगळी घटना समोर आहे. या पूरात एक मगर आपला जीव वाचवण्यासाठी थेट एका घराच्या पत्रावर जाऊन बसली. आता मगरीचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

मगरीने घेतला छताचा आधार –
बेळगावच्या रायबग भागात पाणी लोकांच्या घरात शिरले आहे, सध्या पाण्याची पातळी येवढी आहे की घरच्या घरं पाण्याखाली गेली आहेत. सध्या याभागात पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर भागात पूराने थैमान घातल्यानंतर कर्नाटकच्या अलमट्टी धरणाचे दरवारे उघडण्यात आले आहेत. त्यातून सध्या ५ लाख क्युसेक पर्यंतचा पाण्याचा विसर्ग होत आहे.

Karnakata
आता बेळगाव भागात पाणी शिरल्यानंतर आता लोक आपले घर सोडून सुरक्षित स्थळी पोहचले आहेत. प्राणी देखील आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. याच दरम्यान एका मगरीने स्वत:चा जीव वाचण्यासाठी घराच्या छपराचा आधार घेतला आहे.

१४ जिल्ह्यात पाणी शिरले
सध्या कर्नाटक राज्याच्या १४ जिल्ह्यात पाणी शिरले आहे. त्यात बागलकोट, विजापूर, बेलगावी, दक्षिण कन्नड, चिकमंगलूर, हासन, हुबळी, धारवाड गडक, कोडागू, मैसूर, शिवमोगा, उत्तर कन्नड आणि उडुपी या जिल्ह्यावर परिणाम झाला आहे.
Karnataka-flood
या महापूरात २४ लोकांचा जीव गेला आहे, तर २,३५,१०५ लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ६२४ शिबिर उभारण्यात आली असून त्यातून १,५७,४९८ लोकांना पाणी, भोजन आणि इतर वस्तू पुरवण्यात येत आहेत.
Karnataka-Rescue
३,२२,४४८ हेक्टर शेतीची नुकसान
कर्नाटकमधील पूराने रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यात तब्बल १४२७ कोटीचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री येदियुरप्पा यांच्या मते कर्नाटकमधील तब्बल ३,२२,४४८ हेक्टर शेतीची नुकसान झाले आहे. आता या पूरग्रस्ताना मदत पुरवण्यात येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like