कर्नाटकातही ‘महापूर’, बेळगावसह अनेक ठिकाणी नागरिकांचे ‘स्थलांतर’

बेळगाव : वृत्तसंस्था – मुसळधार पावसामुळे गेल्या चार दिवसांपासून ज्याप्रमाणे कोल्हापूर, सांगली पाण्याखाली आहे, तशीच परिस्थिती बेळगाव, उत्तर कन्नडमध्ये झाली आहे. पाऊस व महापूरात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यु झाला आहे. बेळगाव जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यु झाला असून जिल्ह्यातील ४० हजार १८० जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

कोल्हापूरच्या घाट क्षेत्रात ज्या प्रमाणे मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला तसात मुसळधार पाऊस कोल्हापूर जिल्ह्याला लागून असलेल्या बेळगाव व परिसरात झाला आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी स्वत: बेळगावाला भेट देऊन मदत कार्याची पाहणी केली. ३० हजार घरांच्या पूर्नबांधणीचे आव्हान सरकारपुढे असून अतिवृष्टी आणि पूरस्थितीने बाधित झालेल्यांना मदत आणि पूर्नवर्सनासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे ५ हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांनी १० कोटी रुपये मुख्यमंत्री मदत निधीसाठी दिले आहेत.

अलमट्टी धरणातून ३ लाख ८२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने धरणाच्या खालच्या क्षेत्रात महापूर आला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलमट्टी धरणातून ५ लाख क्युसेकने पाणी सोडावी अशी केलेली विनंती कर्नाटकाने फेटाळून लावली आहे.

अलमट्टीच्या खालच्या भागात अप्पर कृष्णा प्रोजेक्टमधूनही मोठ्या प्रमाणावर विसर्ग केला जात असून त्यामुळे रायपूर, बागलकोट परिसरात मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. उत्तर कन्नडमधून ३ हजार ८८ नागरिकांना सुरक्षितस्थही हलविण्यात आले आहे. शिवमोगा परिसरातून १७ हजार नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –