कर्नाटकच्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा, येडियुरप्पांनी ६ मतांनी विश्‍वासदर्शक ठराव जिंकला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटकमधील सत्तेच्या खुर्चीसाठी सुरु असलेली लढाई अखेर आज संपली. काँग्रेस- जेडीएसचे सरकार कोसळल्यानंतर आज अखेर बी. एस. येडियुरप्पा यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. शनिवारी बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज सभागृहागात विश्वासदर्शक ठराव जिंकला. १०६ विरुद्ध १०० मतांनी बी. एस. येडियुरप्पा यांनी हा ठराव जिंकला.

बहुमत नसल्याने एचडी कुमारस्वामी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर अखेर येडियुरप्पा यांनी या पदाची शपथ घेतली. हा ठराव मांडण्यापूर्वी विधानसभा अध्यक्षांनी १७ आमदारांना अपात्र ठरवल्याने विश्वासदर्शक ठरावाचा आकडा हा १०४ झाला होता. भाजपकडे १०६आमदार असल्याने त्यांनी हा विजय सहज मिळवला. अपात्र ठरवलेल्या या १७ आमदारांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आता या आमदारांवर काय कारवाई होते किंवा त्याच्या बाजूने निर्णय लागला तर हे आमदार काय भूमिका घेणार आणि कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, अपात्र ठरवण्यात आलेल्या या आमदारांना २०२३ पर्यंत कोणतीही निवडणूक लढविता येणार नाही. त्याचबरोबर त्यांना पोटनिवडणूक देखील लढविता येणार नाही.

आरोग्यविषयक वृत्त –