वर्ल्ड रेकॉर्ड ! कर्नाटकमधील ‘ही’ मुलगी दोन्ही हात वापरून मिनिटाला तब्बल 45 शब्द लिहते

कर्नाटक : वृत्तसंस्था – प्रत्येकाच्या अंगी एक कला असते आणि काही लोकांच्या कलेची नोंद जागतिक पातळीवर सुद्धा घेतली जाते. कर्नाटकमधील अशीच एक १६ वर्षीय मुलगी आपल्या दोन्ही हाताने लिहण्याचा स्टाइलमुळे चर्चेत आली आहे. आदी स्वरुपा असे या मुलीचे नाव असून तिच्या या कलेमुळे तिने दोन वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा तिचे नाव नोंदवले आहे.

आयएएनएसला दिलेल्या प्राक्रियेनुसार, स्वरुपा तिच्या सवयीच्या आणि कलेच्या बळावर इंग्लिश आणि कन्नड या दोन भाषांमध्ये एका मिनिटाला ४५ शब्द लिहू शकते. या वर्ल्ड रेकॉर्ड सोबत मिमिक्री, रुबिक क्यूब आणि संगीतात देखील वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा भविष्यात तिचा मानस आहे. त्याचसोबत तिला ४५ शब्द प्रति मिनिट हा रेकॉर्ड मोडून ६० शब्द प्रति मिनिटांपर्यंत जायचं आहे. इतर विद्यार्थ्यांसारखे ती शाळेत जात नसून घरूनच दहावीच्या परीक्षेची तयारी करते. अगदी २ ते वर्षाची असताना तिने दोन्ही हातांनी लिहायला सुरुवात केली होती. तिचे आई वडील तिला विविध गोष्टी करण्यासाठी मार्गदर्शन करत असतात.

सध्या स्वरुपा गिटार शिकण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या आईच्या मदतीने तिने रुबिक क्यूब स्पर्धेत सुद्धा वर्ल्ड रेकॉर्ड बनवलं होत. तसेच कमीत कमी तिला १० वर्ल्ड रेकॉर्ड बनवायचे आहेत. तिच्या कलेविषयी तिचे वडील सांगतात, ती १८ महिन्यांची असल्यापासून वाचायला शिकली होती. तर ३० महिन्यांची असताना लिहायला शिकलेली. म्हणून तिच्यात जन्मतःच हे गन असल्याने, आम्ही नुसते त्यांना वाव देण्याचा प्रयत्न करतो. सध्या ती हिंदुस्थानी संगीत शिकत असून, अलीकडेच तिचा उत्तर प्रदेशातील लता फाउंडेशन कडून एक्सक्लूझिव्ह वर्ल्ड रेकॉर्ड अंतर्गत गौरव करण्यात आला होता.