कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या ‘त्या’ २ आमदारांच्या राजीनाम्यानंतर भाजपाने सत्‍ता स्थापनेसाठी ‘कंबर’ कसली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटकात पुन्हा राजकीय भूकंप येणची शक्यता आहे. याला कारण ठरलंय काँग्रेसच्या आमदारांनी दिलेला राजीनामा. काँग्रेसचे 2 आमदार आनंद सिंह आणि राजेश जरकीहोली यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दावा करण्यात येत आहे की आनंद सिंह गायब झाले आहेत. त्यांना पक्षाने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतू ते संपर्कात येऊ शकले नाही. आनंद सिंह हे बेल्लारी जिल्ह्यांच्या विजयनगरचे आमदार आहेत.

काँग्रेस आमदाराने राजीनामा दिला आहे. परंतू त्यांनी राजीनाम्याचे कारण सांगितले नाही, राजीनामा दिल्यानंतर ते मिडिया समोर आले होते मात्र त्यावेळी त्यांनी सांगितले की राज्यापालाबरोबर बोलल्यानंतरच ते यावर भाष्य करतील.

तर भाजप सरकार स्थापन करेल –
कर्नाटकातील भाजपचे मुख्य येदियुरप्पा यांनी काँग्रेसच्या आमदाराने राजीनामा दिल्यानंतर सांगितले की जर अंतर्गत वादाने जनता दल (सेक्यूलरचे) सरकार पडले तर आम्ही आमचे सरकार स्थापन करण्याची संधी शोधू. तर सरकार बनवण्याची स्थिती असेल तर आम्ही कर्नाटकात स्थायी सरकार बनवण्याचा प्रयत्न करु.

लोकसभा निवडणूकीनंतर कर्नाटकात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. याआधी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी हे सांगून वाद निर्माण केला की, मुख्यमंत्री म्हणून सरकार चालवताना त्यांना कायम त्रासाला सामोरे जावे लागते.

याआधी एचडी देवेगौडा यांनी सांगितले होते की राज्यात पुर्ननिवडणूक होण्याची शक्यता आहे. यामुळे काँग्रेसला चांगलाच धक्का बसला होता. कारण काँग्रेस हे सरकार टिकवू इच्छित आहे.

एचडी देवेगौडा यांनी केलेल्या वक्तव्याला यांनी या वक्तवावर बोलताना सांगितले की, त्यांना विश्वास आहे की सध्या राज्यात कोणत्याही प्रकारच्या पुर्ननिवडणूका होणार नाहीत. एवढेच नाही तर त्यांनी काँग्रेसच्या आमदारांनी बैठक बोलावली आहे.

कुमार स्वामी अमेरिकेत –
कर्नाटकात या हलचाली होत असताना मात्र मुख्यमंत्री कुमारस्वामी कर्नाटकात उपस्थित नाहीत. हे अमेरिकेत एका खासगी यात्रेत व्यस्त आहेत. तर विधानसभा अध्यक्ष केआर रमेश कुमार यांनी सांगितले की कोणत्याही प्रकारच्या राजीनाम्याची कोणतीही माहिती मला अजूनही नाही. ते म्हणाले की त्यांनी ही माहिती मिडियामधील कळाली. त्यांनी आनंद सिंह यांच्याबरोबर कोणतीही भेट झाली नाही.