कर्नाटकच्या राजकारणात भाजपकडून आकड्यांचा ‘खेळ’, काँग्रेस-जेडीएसच्या सत्तेला उतरती ‘कळा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या कर्नाटकच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कमी जागा मिळवूनही काँग्रेसच्या आधारावर जेडीएस आणि काँग्रेसने एकत्र येत मोठ्या प्रयत्नांनी सत्ता स्थापन केली. जेडीएसचे कुमारस्वामी हे कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले. भाजप जेडीएसची सत्ता पाडून आपली सत्ता स्थापन करण्यासाठी पूर्ण जोर लावत आहेत. मात्र आता जेडीएस आणि काँग्रेसची कर्नाटकमधील सत्ता धोक्यात आहे. काल काँग्रेस आणि जेडीएसच्या १३ आमदारांनी राजीनामे दिले, त्याने काँग्रेस आणि जेडीएसला जोराचा धक्का बसला आहे.

काँग्रेस आणि जेडिएसच्या ज्या आमदारांनी राजीनामे दिलेत त्यांनी पुन्हा आपल्या पक्षात जाऊ नये म्हणून भाजप सर्वप्रकारे प्रयत्न करत आहे. तर राज्यातील अपक्ष उमेदवारांनी भाजपला साथ देण्याचे ठरवले आहे. त्यात आता राजीनामे दिलेले आमदार अगर भाजपच्या गोटात गेले तर कर्नाटकमधील विधानसभा जागांचे गणित बदलून जाईल. असे झाले तर भाजपकेडे आमदारांची संख्या वाढेल आणि त्याच्या मोठा फटका काँग्रेस आणि जेडीएसला होईल.

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणूकांमध्ये भाजपला सत्ता स्थापन करण्यात अपयश आले. त्यामुळे हा पराभव भाजपच्या अधिकच जिव्हारी लागला आहे. कर्नाटकमधील २२४ जागांपैकी काँग्रेसकडे ७८, जेडीएस ३७, बसपा १, अपक्ष २, भाजप १०५ आणि अन्य १ अशी आकडेवारी आहे. बहुमतासाठी ११३ जागांची आवशकता आहे. मात्र १३ आमदारंनी राजीनामे दिल्यावर बहुमताचा आकडा हा १०६ होईल. हे गणित पाहता काँग्रेस-जेडीएसकडे १०४ जागा आहेत, तर भाजपकडे १०५ त्यामुळे भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी फक्त एका आमदाराची गरज आहे. कर्नाटकात भाजपला सत्ता स्थापन करण्याची संधी आहे. त्यामुळे कर्नाटकात काय होणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

 तंदुरुस्त राहण्यासाठी वेळापत्रकात करा थोडासा बदल

 ‘फिट अँड फाइन’ राहण्यासाठी नियमित करा हे उपाय

 ‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

नियमित तोंडाची स्वच्छता ठेवल्यास अनेक आजार राहतील दूर