Coronavirus : ‘या’ राज्यातील सरकारकडून आर्थिक पॅकेज जाहीर !न्हावी, धोबी, अ‍ॅटो आणि टॅक्सीचालकांना मिळणार 5000 रूपये

बंगळुरू : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे अशा नागरिकांचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी कर्नाटक सरकारने 1610 कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. तसेच लॉकडाऊनमुळे नुकसान झालेल्या न्हावी, ड्रायव्हर्स, धोबी आणि माळी यांना निधी देण्यात येणार असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. यिडयुरप्पा यांनी सांगितले.

राज्यातील ड्रायव्हर्स आणि न्हावी यांना 5-5 हजार रुपये देण्याची घोषणा मुंख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी केली आहे. राज्यात जवळपास 7 लाख 75 हजार ड्रायव्हर्स आणि 2 लाख 30 हजार न्हावी आहेत. त्यांना या आर्थिक पॅकेजचा फायदा होईल, असे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना 25 हजाराची मदत
फुलांची शेती करणाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने त्यांना फुलांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार प्रति हेक्टर 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे एका शेतकऱ्यासाठी जासीत जास्त 1 हक्टर मर्यादा असणार आहे. याशिवाय भाजीपाला व फळांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील पॅकेज त्यांनी जाहीर केले आहे.

विशेष रेल्वे रद्द करण्याचा निर्णय
याशिवाय राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या जवळपास एक लाख लोकांना 3500 बसेस आणि रेल्वेने त्यांच्या घरी परत पाठवले आहे, असे सांगत मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा म्हणाले, बांधकामाचे काम आता पुन्हा सुरु झाल्याने आम्ही स्थलांतरित मजुरांना कर्नाटकात थांबवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, बांधकाम व्यावसायिक आणि इतर औद्योगिक कामांना सुरु करण्याचा निर्णय मंगळवारी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी घेतला आहे. त्यामुळे मजुरांना आपल्या घरी जाण्यासाठी असलेल्या परतीच्या विशेष रेल्वे त्यांनी रद्द करण्याचा निर्णयही घेतला आहे.