Karnataka High Court चा मोठा आदेश, अटक केलेल्या आरोपीला सामान्यपणे हातकडी घालता येऊ शकत नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Karnataka High Court | अनेकवेळा दिसून येते की, एखाद्या घटनेतील आरोपींची पोलिस हातकड्या घालून परेड काढतात. मात्र कर्नाटक हायकोर्टाने एक असा आदेश दिला असला आहे जो वाचल्यानंतर पोलिस असे करण्यापूर्वी एकदा नक्कीच विचार करतील. (Karnataka High Court)

 

पोलिसांनी आरोपीला हातकडी घालून त्याची सार्वजनिकरित्या परेड घेतल्याची गंभीर दखल घेत कर्नाटक उच्च न्यायालयाने आरोपीला 2 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. त्याच वेळी, न्यायालयाने असेही म्हटले की, अटक केलेल्या आरोपीला सामान्यतः हातकडी लावता येत नाही.

 

पोलिस अधिकार्‍यांना बॉडी कॅम द्या
एखाद्या व्यक्तीला अटक करण्याचा अधिकार असलेल्या सर्व पोलीस अधिकार्‍यांना बॉडी कॅमेरे उपलब्ध करून देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने कर्नाटकच्या डीजीपींना दिले आहेत, जेणेकरून अशा कॅमेर्‍यांद्वारे अटक करण्याची पद्धत रेकॉर्ड केली जाऊ शकते. (Karnataka High Court)

 

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाचे न्यायमूर्ती सूरज गोविंदराज यांनी आपल्या आदेशात सांगितले की, अंडरट्रायल आणि दोषी आरोपींना कधी हातकड्या घातल्या जाऊ शकतात याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

 

फक्त तातडीच्या परिस्थितीत हातकडी
न्यायमूर्ती सूरज गोविंदराज यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, केवळ अत्यंत अत्यावश्यक परिस्थितीत आरोपीला हातकडी लावली जाऊ शकते. जेव्हा अशावेळी हातकडी घातली जाते तेव्हा अटक करणार्‍या अधिकार्‍याला हातकडी घालण्याचे कारण नोंदवणे आवश्यक आहे, जे न्यायालयीन चौकशीसाठी ठेवावे लागेल.

 

खालच्या कोर्टात हजर करण्यासाठी विचाराधीन कैद्याला हातकडी घालण्यासाठी पोलिसांना खालच्या कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल, असेही कोर्टाने म्हटले आहे.

…तर पोलिसांवरच होऊ शकते कारवाई
अशा परवानगीसाठी अर्ज न केल्यास आणि विचाराधीन आरोपीला हातकड्या घातल्या गेल्यास,
संबंधित पोलिस अधिकार्‍यावरच कारवाई केली जाऊ शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे.

 

परीक्षा देऊन घरी परतणारा कायद्याचा विद्यार्थी सुप्रीत ईश्वर दिवटे यास बेळगावी जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील अंकली येथील बाजारपेठेत पोलिसांनी अटक केली.
त्याला हातकडी घालून परेड करून सार्वजनिक बसमधून चिक्कोडी पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

 

पोलिसांनी बनवलेला व्हिडिओच ठरला पुरावा
दुसर्‍या व्यक्तीशी झालेल्या वादात, चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी सुप्रीत ईश्वर दिवटे यांच्याविरुद्ध Negotiable Instruments कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
त्याच्यावर 5 फौजदारी गुन्हे देखील दाखल करण्यात आले असून अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.

 

याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांच्या या कृत्याबद्दल सुप्रीत ईश्वर दिवटे यांने 25 लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
पोलिसांनी स्वत: रेकॉर्ड केलेल्या कृत्याचे व्हिडिओ पुरावेही त्यांने सादर केले.

 

Web Title :- Karnataka High Court | karnataka high court says illegal to handcuff a person without reason and awards rs 2 lakh relief

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पाळीव रॉटव्हिलर कुत्र्याने घेतला सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांना (Retired ACP) चावा

 

Pune Crime | पुणे महापालिकेच्या टेंडरसाठी दिलेल्या कागदपत्राचा गैरवापर करुन काढले 9 लाखांचे कर्ज

 

Devendra Fadnavis | ‘भाजपच्या नेतृत्वाखाली सत्तेवर येणारे सरकार 25 वर्षे चालेल’ – देवेंद्र फडणवीस