Karnataka High Court | विवाहित मुलगी, विवाहित मुलाप्रमाणेच, कर्नाटक हायकोर्टाने सैनिक वेल्फेअर बोर्डाला सुनावले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटक हायकोर्टाने (Karnataka High Court) सैनिक कल्याण बोर्डाने जारी केलेले मार्गदर्शक तत्व फेटाळत निर्णय सुनावला. या मार्गदर्शक तत्वात माजी सैनिकांच्या विवाहित मुलींना डिपेंडंट कार्डपासून वंचित ठेवण्यात आले होते. कोर्टाने (Karnataka High Court) म्हटले, ज्याप्रमाणे मुलगा लग्नाआधी किंवा नंतर मुलगा राहतो त्याचप्रमाणे लग्नाआधी आणि नंतर मुलगी ही मुलगीच राहते. जर लग्नानंतर मुलाचे स्टेटस बदलत नसेल तर लग्नानंतर मुलीचे स्टेटस बदलू नये.

 

कर्नाटक हायकोर्टाच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने २ जानेवारी रोजी हा निर्णय दिला. हायकोर्टाने केंद्र सरकारला असेही म्हटले की, जेंडर इक्वेशनच्या आधारावर त्यांनी माजी संरक्षण कर्मचार्‍यांकडे एक्स सर्विसमेन म्हणून पाहणे थांबवावे आणि माजी संरक्षण कर्मचार्‍यांसाठी जेंडर न्यूट्रल नोमेनक्लेचरकडे लक्ष द्यावे. मीडिया रिपोर्टनुसार, कर्नाटक उच्च न्यायालयाचे (Karnataka High Court) न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना माजी लष्करी कर्मचारी सुभेदार रमेश खंडप्पा यांच्या ३१ वर्षीय मुलीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत होते. २००१ मध्ये ऑपरेशन पराक्रमनंतर माईनची स्वच्छतेच्या दरम्यान झालेल्या अपघातात सुभेदारांचा मृत्यू झाला होता.

 

डिपेंडंट कार्ड न दिल्याने मुलीची कोर्टात धाव
मद्रास इंजिनियर ग्रुप (एमईजी) च्या माजी सुभेदाराची मुलगी प्रियंका पाटील,
जी तिच्या वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा १० वर्षांची होती, तिने २०२१ मध्ये सैनिक कल्याण मंडळाने विवाहित
असल्याच्या कारणास्तव डिपेंडंट कार्ड जारी करण्यास नकार दिल्याबद्दल कर्नाटक हायकोर्टात धाव घेतली.
प्रियांका पाटील यांनी २०२० मध्ये राज्यातील सरकारी पदवी महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या
भरतीदरम्यान माजी सैनिकांच्या नातेवाईकांसाठी कर्नाटक सरकारने केलेल्या १० टक्के आरक्षणाचा
लाभ घेण्यासाठी माजी संरक्षण कर्मचाऱ्याची मुलगी म्हणून ओळख मागितली होती.

 

Web Title :- Karnataka High Court | married daughter equal to married son karnataka high court bluntly tells sainik welfare board

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Budget 2023 | अर्थमंत्री सीतारामन मध्यमवर्गीयांना देऊ शकतात मोठी भेट, टॅक्स सवलत मर्यादा वाढवण्यावर विचार

Nana Patole | ‘मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी योगी आदित्यनाथांना पायघड्या’ – नाना पटोले

Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला; म्हणाले, ‘आपल्याकडे एक सीएम तर दुसरे…’