वरिष्ठ IPS डी. रूपा यांनी ट्विटरवरून घेतला ब्रेक, म्हणाल्या – ‘माझ्याविरोधात हॅशटॅग चालवण्यात आले’

बेंगळुरु : वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि कर्नाटकच्या प्रमुख सचिव गृह डी. रूपा यांनी ट्विटरवरून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. फटाके बॅनवरून ट्विटरवर सुरू झालेल्या वादविवादानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. डी रूपा यांनी शनिवारी ट्विट केले की, ट्विटरवरून ब्रेक घेण्यापूर्वी मी त्या सेलिब्रिटीजसाठी एक व्हिडिओ शेयर करत आहे, जे काहीही माहित नसताना माझ्याबाबत बोलत आहेत. हा व्हिडिओ हिंदीत आहे. मी साऊथ इंडियन असूनही दूरदर्शन पाहून हिंदी शिकले होते. डी रूपा यांनी एका अन्य ट्विटमध्ये म्हटले, माझ्याविरूद्ध हॅशटॅग चालवून माझ्यावर प्रेशर आणले गेले. हे सर्वांना चांगले माहित होते की, सरकारी कर्मचारी म्हणून ट्रोलर्सला त्यांच्या भाषेत उत्तर देऊ शकत नाही. तुम्ही मला सांगा ट्विटरवर सर्वात जास्त पॉवरफुल कोण आहे?

याच आठवड्यात डी रूपा यांचा फटाके बॅनवरून वादविवाद झाला होता. फटाके बॅनवरून डी रूपा यांचे मत होते की, फटाके दिवाळीशी संबंधीत रिती-रिवाजाचा भाग नाहीत. त्यांनी म्हटले होते की, आतषबाजीचा जन्म 15व्या शतकात झाला आहे. फटाके बॅन सकारात्मक रूपाने घेतला पाहिजे. TrueIndology नावाच्या यूजने याचा विरोध केला. त्या यूजरने शास्त्रांशी संबंधित काही उदाहरणे देऊन हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की, आतषबाजीचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे आणि आतषबाजी हिंदू धर्माचा भाग आहे.

2000 बॅचच्या आयपीएस अधिकारी डी. रूपा सध्या कर्नाटकच्या प्रमुख सचिव गृह या पदावर आहेत. त्या राज्याच्या पहिल्या अशा महिला अधिकारी आहेत, ज्यांना ही जबाबदारी मिळाली आहे. आपल्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे डी रूपा यांची 41 वेळा ट्रान्सफर झाली आहे.