धक्कादायक ! भाडेकरूनं दिला नाही ‘रेंट’, घरमालकानं केला हवेत ‘गोळीबार’ (व्हिडीओ)

बेलगाम : वृत्तसंस्था – कर्नाटकच्या बेलगाम जिल्ह्यात भाडेकरू भाडे देऊ न शकल्याने घर मालकाला राग आला आणि त्याने रागाच्या भरात हवेत फायरिंग केली. ही घटना बेलगाम जिल्ह्याच्या चिक्कोडीमध्ये घडली आहे. फायरिंग करणार्‍या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फायरिंग करणार्‍या घरमालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सफेद कपडे घातलेला व्यक्ती फायरिंग करताना स्पष्ट दिसत आहे.

कोरोना व्हायरस महामारीमुळे देशात लागू केलेल्या लॉकडाऊनचा परिणाम लोकांच्या आर्थिक स्थितीवर झाला आहे. लाखो लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. या कारणामुळे भाडेकरू वेळेवर भाडे देऊ शकत नाही, तसेच वीज बील भरू शकत नाहीत, अशी स्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन दरम्यान आपल्या भाषणात अशा लोकांना सवलत देण्याची विनंती केली होती.